For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसआरएफजीसीसी, आरपीडी अ विजेते

10:53 AM Oct 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
एसआरएफजीसीसी  आरपीडी अ विजेते
Advertisement

सिक्स-ए-साईड आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा हॉकी संघटना आयोजित एकदिवसीय मेजर ध्यानचंद चषक सिक्स ए साईड आंतरमहाविद्यालयीन हॉकी स्पर्धेत एसआरएफजीसीसीए संघाने ब संघाचा तर मुलींमध्ये आरपीडी अ ने आरपीडी ब चा पराभव करून मेजर ध्यानचंद चषक पटकाविला. मेजर बी. ए. सय्यद मैदानावरती या एकदिवसीय स्पर्धेत 12 संघ सहभागी झाले होते. संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, साजिद शेख, खलीक बेपारी, श्रीनिवास पाटील व गणपत कडोलकर आदी मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंदच्या प्रतिमेला हार घालून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मुलांच्या पहिल्या अंतिम सामन्यात एसआरएफजीसीसी अ संघाने ब संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले.

त्यामुळे गोलफरक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात 28 व्या मिनिटाला समीर देसाईने गोल केला. त्यानंतर ब संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना अपयश आले. मुलींच्या अंतिम सामन्यात आरपीडी अ संघाने ब संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्राच्या 18 व्या मिनिटाला आरपीडीच्या समीक्षा पाटीलने गोल करून 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात आरपीडी अ संघाने आक्रमक चढाया केल्या. पण आरपीडी ब च्या बचावफळीमुळे त्यांच्या चढाया असफल ठरल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, एम. बी. नदाफ, साकीब बेफारी व गोपाळ खांडे, खलिक बेपारी, श्रीनिवास पाटील, गणपत कडोलकर, प्रकाश हळदणकर, डॉ. गिरीशंकर माने व शहबाज नाईक आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, एसआरएफजीसीसी व आरपीडी अ, ब संघांना चषक, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.