महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

श्रीजेशची 16 क्रमांकाची जर्सीही ‘हॉकी इंडिया’कडून ‘निवृत्त’

06:43 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गोलरक्षकाच्या कारकिर्दीला मानवंदना, श्रीजेश आता कनिष्ठ पुरुष हॉकी संघ प्रशिक्षकाच्या नव्या भूमिकेत

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पॅरिस ऑलिम्पिकनंतर खेळातून निवृत्ती जाहीर करणाऱ्या गोलरक्षक पी. आर. श्रीजेशच्या सन्मानार्थ हॉकी इंडियाने राष्ट्रीय वरिष्ठ पुऊष हॉकी संघातून 16 क्रमांकाची जर्सीही ‘निवृत्त’ करत असल्याचे जाहीर केले आहे. हा निर्णय म्हणजे श्रीजेशच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला दिलेली एक प्रकारची मानवंदना आहे. यामध्ये लागोपाठ प्राप्त केलेली ऑलिम्पिक कांस्यपदके समाविष्ट आहेत. राहुल द्रविडपासून प्रेरणा घेऊन श्रीजेशने आता प्रशिक्षणाचा मार्गाचा अवलंब केला असून तो कनिष्ठ पुऊष हॉकी संघाचा प्रशिक्षक बनणार आहे.

‘हॉकी इंडियाने श्रीजेशची वरिष्ठ पुऊष संघातील 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे’, असे सचिव भोला नाथ यांनी सांगितले. हे विधान श्रीजेशने त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत मिळविलेला प्रचंड आदर आणि प्रशंसा अधोरेखित करते. याव्यतिरिक्त हॉकी इंडियाने कनिष्ठ पुऊष हॉकी संघाचा प्रशिक्षक म्हणून श्रीजेशची नवीन भूमिका जाहीर केली आहे.

36 वर्षीय श्रीजेशने द्रविडकडून प्रेरणा घेऊन कोचिंगमध्ये कारकिर्दीच्या आपल्या आकांक्षा उघड केल्या होत्या. ‘मला प्रशिक्षक व्हायचे आहे. ही माझी नेहमीच योजना राहिली होती, पण आता कधी असा प्रश्न आहे. निवृत्तीनंतर कुटुंब प्रथम येते. त्यामुळे त्यांना ते मान्य आहे का हे जाणून घेण्याच्या दृष्टीने मी त्यांच्याशी बोलणे आवश्यक आहे. आता तुम्ही तुमच्या पत्नीचे थोडेसे ऐकावेच लागते’, असे श्रीजेशने मुलाखतीत स्पष्ट केले होते.

श्रीजेशने तऊण कलागुणांना वाव देण्यासाठी आपली रणनीती सांगितली. ‘मला ज्युनियर्सपासून सुऊवात करायची होती आणि राहुल द्रविड हे एक उदाहरण आहे. खेळाडूंचा गट विकसित करायचा, त्यांना वरिष्ठ संघात घ्यायचे आणि त्यांना तुमच्या पावलांवर पावले टाकू द्यायचे’, असे तो म्हणाला. श्रीजेशच्या निवृत्तीने भारतीय हॉकीमधील एका महत्त्वपूर्ण अध्यायाची समाप्ती झाली आहे. त्याचा वारसा केवळ ऑलिम्पिकमधील त्याच्या कामगिरीनेच घडविलेला नाही, तर भारतीय हॉकीचे भविष्य घडविण्याकडील त्याच्या वचनबद्धतेनेही घडविलेला आहे.

राहुल द्रविडचा आदर्श

राष्ट्रीय संघासाठी मजबूत फळी तयार करण्यास श्रीजेशचे प्राधान्य आहे. कनिष्ठ पुऊष हॉकी संघाचा नवीन प्रशिक्षक म्हणून वावरताना राहुल द्रविडने पत्करलेल्या मार्गाचे अनुकरण करण्याचे त्याचे उद्दिष्ट आहे. द्रविडने वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत जाण्यापूर्वी भारताच्या 19 वर्षांखालील आणि भारत ‘अ’ संघांपासून सुऊवात केली होती. हा पद्धतशीर दृष्टिकोन वरिष्ठ संघात प्रतिभेचा सातत्यपूर्ण आणि दर्जेदार प्रवाह कायम राखण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article