स्क्विड गेम सीझन 2 चा ट्रेलर सादर
प्लेयर नंबर 456 ची एंट्री, जीवघेण्या गेमदरम्यान मोठा ट्विस्ट
अखेर ‘स्क्विड गेम सीझन 2’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यावेळी देखील लोक गेममध्ये पैसे जिंकण्यासाठी स्वत:चा जीव पणाला लावणार आहेत, परंतु प्लेयर नंबर 456 ची पुन्हा एंट्री झाल्यावर ट्विस्ट येणार आहे. या प्लेयरने पहिल्या सीझनमध्sय गेम जिंकला होता आणि 45.6 अब्जची रक्कम जिंकली होती. त्या गेममध्ये तो एकमात्र जिवंत प्लेयर राहिला होता. परंतु आता हे प्लेयर एका नव्या हेतूसोबत गेममध्ये पुन्हा एंट्री करणार आहे. आता तो लोकांचे जीव वाचवू इच्छितो तसेच या जीवघेण्या गेमच्या मास्टरमाइंडचा खात्मा करु पाहत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते.
स्क्विड गेम सीझन 2 मध्ये प्लेयर 456 ची भूमिका अभिनेता ली जुंग जेईने साकारली आहे. लीसोबत स्क्विड गेम 2 मध्ये डिटेक्टिव्ह ह्यांग जून-हो च्या भूमिकेत वाई हा-जूनचे पुनरागमन झाले आहे. याचबरोबर ली बायुंग-हुन फ्रंटमॅनच्या भूमिकेत परतणार आहे. ही सीरिज नेटफ्लिक्सवर 26 डिसेंबर रोजी स्ट्रीम होणार आहे. स्क्विड गेमचा पहिला सीझन 2021 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी नेटफ्लिक्सवरील सर्वात पाहिली जाणारी सीरिज ठरली होती. या सीरिजला 2.2 अब्ज तासापर्यंत पाहिले गेले होते. म्हणजेच या शोला 265 दशलक्ष ह्यूज मिळाल्या होत्या.