सोनु के टिटू की स्विटी च्या स्विकल लवकरच
मुंबई
कार्तिक आर्यनच्या अभिनयाच्या करिअरमधला माईल स्टोन ठरलेला सोनु के टिटू की स्विटी हा सिनेमा खूप गाजला होता. आता या सिनेमाच्या सिक्वलवर काम चालू आहे. लवकरच शुटींग सुरू होऊ शकते.
सध्या कार्तिक आर्यनच्या भुलभुलैय्या ३ चे वारे जोरदार वाहत आहे. सिनेमाने ही दणक्यात केली. कार्तिकच्या सोनु के टिटू की स्विटी या सिनेमाने बॉक्स ऑफीसवर जोरदार काम केले होते. त्यामुळे या सिनेमाची आता सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. सिनेमाच्या निर्मात्यांची आणि प्रेक्षकांची सिक्वल यावा अशी मागणी आहे.
लव रंजन हे सध्या सिनेमाच्या कथेवर काम करत आहेत. २०२५ च्या शेवटाला शुटींग सुरु होण्याची शक्यता आहे. सिनेमाचे कथानक पार्ट १ जिथे संपला तिथून पुढे असेल की पुणतः नवीन असेल हे अजून ठरायचे आहे, अशी चर्चा सिनेवर्तुळात होत आहे. पण सिक्वेलवर कार्तिक आर्यन आणि लवरंजन यापैकी कोणीही अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.