महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पिकांसाठी स्प्रिंक्लर पद्धत उपयोगी

06:03 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाण्याच्या बचतीसाठी फायदेशीर, मागासवर्गीय शेतकऱ्यांना 90 टक्के सबसिडी

Advertisement

वार्ताहर/ किणये

Advertisement

स्प्रिंक्लर पद्धत ही पावसाप्रमाणे पिकांना आणि रोपट्यांना पाणी देण्याची आधुनिक पद्धत आहे. या तंत्रामध्ये स्प्रिंक्लर हेड असलेल्या पाईपद्वारे पाण्याची फवारणी पिकाला जितक्या पाण्याची आवश्यकता आहे त्याप्रमाणे करण्यात येते. त्यामुळे शिवारातील विहिरी व कूपनलिकेच्या पाण्याची बचत होते. सध्या बेळगाव तालुक्यात दुष्काळ स्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत स्प्रिंक्लर पद्धत महत्त्वाची ठरणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा लाभ घेणे महत्त्वाचे आहे.

कृषी खात्यामार्फत मागासवर्गीय (एससी)शेतकऱ्यांसाठी ही स्प्रिंकलर योजना विशेष राबविण्यात आली असून, यासाठी कृषी खात्याकडून निधी उपलब्ध करण्यात आला आहे. मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी 90 टक्के सबसिडी देण्यात येणार असल्याची माहिती बेळगुंदी, उचगाव विभागाचे कृषी अधिकारी सी. एस. नायक यांनी दिली आहे.

सध्या तालुक्यात दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. यंदा मान्सून काळात दरवर्षी प्रमाणे पाऊस झाला नाही. त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली आहे. तसेच शेतशिवारातील विहिरी व कूपनलिकांच्या पाणीपातळीतही घट झाली. यामुळे आता पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांना अवघड होणार आहे. त्यासाठी शेत शिवारातील पाण्याची बचतही महत्त्वाची ठरणारी आहे. कमी पाण्याचा वापर करून पीक घेण्यासाठी आता शेतकऱ्यांनी अधिक लक्ष दिले पाहिजे. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांसाठी स्प्रिंक्लर पद्धत योग्य ठरणार आहे.

स्प्रिंक्लरसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा

उन्हाळ्यात तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारचे भाजीपाला पिके घेऊन आपला उदरनिर्वाह चालवितात. या शेतकऱ्यांना पाणी समस्येचा मोठा सामना यावर्षी करावा लागणार आहे. त्यामुळे स्प्रिंक्लर पद्धतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा.

किणये, बेळगुंदी, बहाद्दरवाडी, बेळवट्टी, बाची, सोनोली, यळेबैल, बाकनूर, जानेवाडी, रणपुंडये, कर्ले, उचगाव, राकसकोप, बोकमूर, इनामबडस, येळ्ळूर, बेनकनहळ्ळी, हंगरगा, मंडोळी, सावगाव, सुळगे, बाळगमट्टी, बामनवाडी अशा उचगाव सर्कल भागातील शेतकऱ्यांसाठी उचगाव रयत पेंद्रामध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांना स्प्रिंक्लरसाठी सबसिडी देण्यात येणार आहे.

उचगाव रयत केंद्रामध्ये शेतकऱ्यांसाठी स्प्रिंक्लरकरिता निधी उपलब्ध

सध्या उचगाव रयत केंद्रामध्ये मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी स्प्रिंक्लरकरिता निधी उपलब्ध आहे. याचा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर लाभ घ्यावा, तसेच सामान्य शेतकऱ्यांसाठीही ही योजना राबविण्यात येणार आहे. येणाऱ्या काही महिन्यात सामान्य शेतकरीही सबसिडीमध्ये स्प्रिंक्लर घेऊ शकणार आहेत. त्यामुळे मागासवर्गीय व सामान्य शेतकऱ्यांनी कागदपत्रे जमा करावीत, मागासवर्गीयांसाठी त्वरित निधी उपलब्ध होणार आहे. पुढील महिन्यात सामान्यांसाठी योजना लागू होणार आहे. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे सात बारा उतारा, तलाठ्याकडून खाते उतारा, पाणी दाखला सर्टिफिकेट, बँक पासबुक, आधारकार्ड, ग्राम पंचायतीकडून शिफारस पत्र, 20 रुपयांचा बॉँड पेपर व जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उचगाव रयत संपर्क केंद्रामध्ये त्वरित जमा करावीत आणि या योजनेचा लाभ घ्यावा.

सी. एस. नाईक कृषी अधिकारी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article