मैदानात क्षमता टिकवायची आहे...? मग डाएट प्लॅन करा!
स्पोर्टस् न्युट्रीशियन्सचा कोल्हापुरी फुटबॉलपटूंना महत्वपूर्ण सल्ला; स्टॅमिना, एनर्जी टिकवण्यासाठी कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅटस देणारे पदार्थ खाण्याचे आवाहन, डाएटअभावी खेळावर होता विपरीत परिणाम, चहा सक्तीने टाळा
संग्राम काटकर कोल्हापूर
नव्वद मिनिटांचा फुटबॉल सामना खेळताना खेळाडूंना 10 ते 13 किलोमीटर इतके अंतर मैदानात पळावे लागते. चेंडूवर नियंत्रण घेण्यासाठी तर लांब अंतराच्या कित्येक प्रिंटही माराव्या लागतात. सततच्या प्रिंटसह चेंडू पासिंग करताना आणि पास देताना मैदानातील जागा बदलावी लागते. यातून खेळाडूंच्या शरीरातील कॅलरीज जळतात, घामही येतो. त्यामुळे थकवा जाणवतो. हाच प्रकार रोजच्या सरावावेळीही घडतो. मात्र यातून शरीर रिकव्हर करण्यासाठी खेळाडूने चहा, जंकफुडऐवजी डाएट प्लॅन कऊन कार्बोडायड्रेट (प्रथिने), प्रोटीन, फॅटस् देणारे पदार्थ, फळे सक्तीने खाणे जऊरीचे आहे. जे खेळाडू खातील त्यांचे शरीर रिकव्हर तर होईलच, शिवाय पुढील सामन्यासाठी एनर्जीही मिळून दमदार खेळ करता येईल, असे स्पोर्टस् न्युट्रीशियनंचे सांगणे आहे. कोल्हापुरातील फुटबॉल संघांनी याकडे गांभिर्याने पाहून कृतिशील होणे जऊरीचे आहे.
कोल्हापुरातील छत्रपती शाहू स्टेडियममध्ये पूर्वीपासून होत असलेल्या 90 मिनिटांच्या फुटबॉल सामन्यात खेळणाऱ्या खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडू पूर्वीपासूनच डाएटपासून अनभिज्ञ आहेत. सरावासाठी आवश्यक सुविधा नसताना आणि डाएट प्लॅनची माहिती नसताना नैसर्गिक ताकदीवर त्यांनी जिगरबाज खेळ कऊन मैदान गाजवले आहे. जुना काळ्यातील खेळाडू सांगतात, की फुटबॉल खेळाडूचा डाएट असतो, हेच माहिती नव्हते. सामन्याच्या मध्यंतरात आणि सामना संपल्यानंतर लिंबूच्या एक-दोन फोडी आणि एक-दोन चमके ग्लुकॉनडी घेऊन स्वस्त बसायचो. नंतर घरी जाऊन थेट जेवायचो. हाच आमचा डाएट होता. पण जसा काळ बदलला तसा फुटबॉलचा खेळ बदलला.
संघांमधील खेळाडूंसाठी डाएटीस्ट, फिजिओथेरपीस्ट, मसाजर गरजेचे झाले. मात्र डाएटीस्ट, फिजिओथेरपीस्ट, मसाजर फुटबॉल संघासाठी नेमून त्यांना पगार देणे कोल्हापुरी संघ व्यवस्थापनांना परवडत नव्हते. त्यामुळे डाएटीस्ट, फिजिओथेरपीस्ट, मसाजर संघासाठी कधी नेमले नाहीत. दैनंदिन डाएटची तर खेळाडूंना कल्पनाच नाही. मात्र बदलते वातावरण, हवामान आणि सामना खेळताना होणारे एर्क्झशनचा विचार करता प्रत्येक खेळाडूने डाएट प्लॅन करून घेतला पाहिजे, असा निष्कर्ष समोर आला. कारण डाएटनुसार पदार्थ खाल्ल्याने सामन्यासाठी एनर्जी तर मिळेतच, शिवाय जोमदार खेळासाठी ताकतही देतील.
सक्तीने चहा टाळा...
कोल्हापुरातील खेळाडू सामना संपल्यानंतर थेट चहा अथवा जंकफुट खाण्याकडे जातात, हे स्पोर्टस् न्युट्रीशियनच्या निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी सांगितले. की, सामन्यात खेळताना घामासोबत एनर्जीही जाते. मोठ्या प्रमाणात कॅलरीज जळतात. अशा स्थितीत खेळाडूंनी चहा अथवा जंकफुट खाणे त्रासदायक ठरते. कारण हे दोन्ही पदार्थ शरीराची रिकव्हरी कऊ शकत नाहीत. शरीराची रिकव्हरी झाली नाही तर त्याचा सामना खेळण्यासाठी लागणाऱ्या क्षमतेवर परिणाम होतो. शिवाय विनाकारण पोटात साखर गेल्याने थोडी सुस्ती येते. त्याचा परिणाम संघाला भोगावा लागतो.
ऑफ सिझनचा डाएट...
स्पर्धा नसलेल्या कालावधीत फुटबॉलपटूंनी ऑफ सिझनचा डाएट प्लॅन कऊन घ्यावा. फुटबॉलच्या दैनंदिन सरावानंतर प्रत्येक खेळाडूंनी किमान 60 टक्के कार्बोडायड्रेड, 20 टक्के प्रोटीन व 20 टक्के फॅटस् देणारे पदार्थ व फळे खावेत. तज्ञाकडून याचे नियोजन कऊन घ्यावे. या नियोजन दुपारी व रात्रीच्या जेवणावेळी कार्बोडायड्रेड, प्रोटीन व फॅटस् देणारे पदार्थ व फळे खावीत. असे केल्याने एनर्जी डेव्हलप होत राहते.
सिझन डाएट प्लॅन...
फुटबॉलचा सिझन सुऊ झाल्यानंतर खेळाडूंना दक्ष राहूनच डाएट प्लॅन करणे अत्यंत जऊरीचे आहे. सामने खेळण्यापूर्वी अथवा सामन्यानंतर खेळाडूला 55 टक्के कार्बोडायड्रेड, 30 टक्के प्रोटीन व 20 टक्के फॅटस् मिळतील असे पदार्थ व सिझनेब फळे खावी लागतील. असे कल्याने सामना खेळताना जळालेल्या कॅलरीज, एनर्जीत रिकव्हर होऊन जाईल. त्याचा फायदा पुढील सामना खेळण्यासाठी होईल.
सप्लिमेंटही आवश्यक...
फुटबॉल अथवा कोणत्याही खेळाचा सामना खेळल्यानंतर अथवा दैनंदिन सरावानंतर सप्लिमेंटअंतर्गत मिळणारी प्रोटीन व क्रीएटीन पावडर पाण्यात टाकून घ्यावी. दोन्ही पावडर सप्लिमेंटची विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये मिळतात. तज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रोटीन व क्रीएटीन पावडर घेतल्यास सामना जोमदारपणे खेळण्यासाठी आवश्यक तितके बळ शरीरात तयार होते. रोज 25 ग्रॅमध्ये प्रोटीन पावडर घेतल्याने मसल बळकट होतात. तसेच रोज 5 ग्रॅम क्रीएटीन पावडर घेतल्याने सामना खेळण्यासाठी योग्यती क्षमता (स्टॅमिना) वाढते, असे संशोधनातून समोर आले आहे.
म्हणून खेळाडूला एनर्जी मिळते....
कार्बोडायड्रेड देणारे पदार्थ व फळे खाल्ल्याने शरीराला ग्यायकोजनची निर्मिती होते. हे ग्लायकोजन माणसाच्या शरीरातील लिव्हरमध्ये (यकृत) जाते. त्यामुळे लिव्हरमध्ये ग्लुकोजची निर्मिती होते. शिवाय शरीरासाठी आवश्यक असलेले पाणीही तयार होते. ही साऱ्या प्रक्रीयेतून फुटबॉलपटूलाच नव्हे तर कोणत्याही खेळातील खेळाडूला सामना खेळण्यासाठी आवश्यक तेवढी एनर्जी मिळवून देते.
रिया मिलिंद गाडवे- स्पोर्टस् न्यूट्रीशियन
यातून मिळते कार्बोहायड्रेङ : कडधान्य, रताळ, बटाटा, भात, ज्वारीचा पास्ता, केळी, सफरचंद, पपई, किणवा, ब्राऊन राईस, इडली.
यातून मिळते प्रोटीन : अंडी, चिकन, मासे, सोयाबीनचे पनीर
यातून मिळतात फॅटस् : बदाम, काजू, अक्रोड, पिनट बटर (शेंगदाणा बटर)