महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

प्रणॉयच्या ट्रेनरच्या खर्चास क्रीडा मंत्रालयाची मान्यता

06:00 AM Jul 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

केंद्रीय युवासेवा व क्रीडा मंत्रालयाच्या मिशन ऑलिम्पिक सेलने पुरुष बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयच्या ट्रेनरसाठी आर्थिक साह्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमधील ट्रेनर रोहन जॉर्ज मॅथ्यूज यांचा सर्व खर्च क्रीडा मंत्रालय करणार आहे. टार्गेट पोडियम स्कीम अंतर्गत मॅथ्यूज यांना प्रवास, निवास, रोजचा भत्ता, व्हिसा फी, वैद्यकीय व अन्य खर्च मिळणार आहे. प्रणॉयप्रमाणे अॅथलीट विकाश सिंग, सूरज पन्वर, अंकिता ध्यानी, सर्वेश कुशारे व नेमबाज अनंतजीत सिंग नरुका यांचे प्रस्तावही मिशन ऑलिम्पिक सेलने मंजूर केले आहेत. विविध क्रीडा साहित्य व स्पर्धेचा खर्च त्यांना दिला जाणार आहे. रायफल नेमबाज रुद्रांक्ष पाटीलचा सर्बियातील ट्रेनिंग खर्चही एमओसीने मान्य केला असून तो 50 मी. 3 पी आणि 10 मी. एअर रायफलचे ट्रेनिंग सर्बियाच्या सेबिक मिलेन्को यांच्याकडून घेत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article