खेळामुळे निरोगी आरोग्य राखण्यास मदत
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : व्हीटीयूमध्ये कर्मचाऱ्यांसाठी क्रीडा स्पर्धांचे आयोजन
बेळगाव : खेळ व विविध स्पर्धांमध्ये सहभाग अत्यावश्यक असून, खेळामुळे निरोगी आरोग्य राखण्यास मदत होते.यामुळे आपण आपली जीवनशैली निरोगी ठेऊ शकतो. तसेच खेळामुळे शारिरीक तंदुरुस्ती, मानसिक स्थिरता, जीवन कौशल्ये विकासित होण्यास मदत होते. खेळ शिस्त, आत्मविश्वास व ताण व्यवस्थापन यासारखे महत्त्वाचे गुण विकसित करतो, असे मत जि. पं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी राहुल शिंदे यांनी व्यक्त केले. व्हीटीयूच्या मैदानात ग्रामीण विकास, पंचायराज विभागाने आयोजित केलेल्या क्रीडा महोत्सवाते बोलत होते.
शिंदे पुढे म्हणाले, खेळ प्रत्येकाच्या जीवनात विशेष भूमिका बजवतात. खेळ नेहमीच माणसाला निरोगी, समृद्ध व सक्रिय बनवतो. आपण आपले शरिरीक व मानसिक आरोग्य राखल्यास जीवनात उंच भरारी घेता येते. यासाठी जीवनात खेळ आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विविध स्पर्धांमधील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पोलीस आयुक्त भूषण बोरसे,जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद,जि.पं.उपसचिव बसवराज हेग्गनायक, बसवराज अडवीमठ, रवी बंगारप्पनवर, परशुराम दुडगुंटी, गंगाधर दिवटर यांच्यासह ता. पं. ईईओ, साहाय्यक संचालक, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.