संजीवीनी फौंडेशनतर्फे क्रीडास्पर्धा उत्साहात
बेळगाव : संजीवीनी फौंडेशनच्या काळजी केंद्रात वास्तव्यास असलेल्या रुग्णांसाठी सावकाश चालणे, लिंबू चमचा, अग्निचा वापर न करता विविध पदार्थ बनविणे, शंभर मीटर धावणे, पोत्यात पाय घालून धावणे, बेडूक उड्या, कॅरम, मेकअप, मेहंदी आणि रांगोळी काढणे या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. प्रीती राजू चौगुले यांच्या हस्ते फीत कापून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थापक डॉ. सविता देगिनाळ, संचालक रेखा बामणे, सल्लागार सदस्य डॉ. नविना शेट्टीगार, विद्या सरनोबत उपस्थित होत्या. यावेळी डॉ. देगिनाळ म्हणाल्या, रुग्णांना आयुष्यात आनंद मिळावा यासाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रम आयोजित करीत असतो. या स्पर्धा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायद्याच्या ठरतात. ही क्रीडास्पर्धा यशस्वी करण्यासाठी केंद्रातील कर्मचाऱ्यांचे व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. विजेत्यांना रविवार दि. 23 रोजी आयएमईआर कॉलेजच्या सभागृहात होणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनात बक्षिसे वितरित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विजयी स्पर्धक खालीलप्रमाणे
- लिंबू चमचा : 1) प्रकाश उपसकर, 2) आकाश रामण्णवर, 3) गौरी कलदुर्गी.
- 100 मीटर धावणे : 1) आकाश रामण्णवर, 2) योगिता कांबळे, 3) प्रथम के.
- सावकाश चालणे : 1) सुधा पट्टेद, 2) शांता होनकांडे, 3) नागचंपा एच.
- अग्निशिवाय अन्न : 1) गौरी कलदुर्गी आणि शोभा बखेडी, 2) योगिता कांबळे आणि गौरम्मा, 3) सागरिका बालचंद्रन आणि प्रकाश उपसकर.
- मेक अप : 1) गौरी कलदुर्गी, 2) शोभा बखेडी, 3) योगिता कांबळे.
- रांगोळी : 1) शोभा बखेडी आणि योगिता कांबळे, 2) शकुंतलाम्मा आणि गौरी कलदुर्गी, 3) जनार्दन दीक्षित आणि आदिती नाईक.
- बेडूक उडी : 1) पीयूष सखदेव, 2) विश्वेश्वर नाडगौडा, 3) आदिती नाईक.
- कॅरम : 1) प्रकाश उपसकर, 2) प्रीती बी., 3) आकाश रामण्णवर,
- मेहंदी : 1) गौरी कलदुर्गी, 2) प्रीती बी., 3) अंजली श्रीनिवास.
- पोत्यात पाय घालून धावणे : 1) आकाश रामण्णवर, 2) प्रीती बी., 3) आदिती नाईक.