कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

देसूर हायस्कूलच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

10:18 AM Jan 23, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : देसूर येथील द.म.शि.मंडळ संचलित देसूर हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष गंगाराम मजुकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून एसडीएमसी सदस्य एस. बी. पाटील, शांताराम लक्केबैलकर, माजी मुख्याध्यापक वाय. एम. व्हंडेकर उपस्थित होते. ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक जे. एस. पाटील यांनी केले. म. ज्योतीराव फुले प्रतिमा पूजन एस. बी. पाटील यांनी केले. ध्वजपूजन व ध्वजारोहण वाय. एम. व्हंडेकर यांनी केले. क्रीडाज्योत पाहुण्यांनी स्वीकारले. शौर्य निट्टुरकरने विद्यार्थ्यांना शपथ देवविली. पाहुण्यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. सुत्रसंचालन आर. पी. पाटील यांनी केले. तर आर. ए. कुरंगी यांनी आभार मानले. व्ही. टी. कुकडोळकर यांनी परिश्रम घेतले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article