अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ रेणुका मंदिर ते नेहरूनगर परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर :
दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार फेरीला रेणुका मंदिर ते नेहरूनगर परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी नागरिकांनी महायुतीच्या पदाधिक्रायांशी संवाद साधत आपल्या समस्या मांडल्या व परिसरात विकासकामे करण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातील 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्यासाठी भाजपा सरकार कार्यरत आहे. राज्यात महायुती सरकार देखील याच ध्येयाने काम करते आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या मार्गावर घेऊन जात असताना कोल्हापूरमधील 50 हजार महिलांना लखपती दीदी करण्यासाठी अमल महाडिक कटिबद्ध आहेत, असे प्रतिपादन सौ. ग्रीष्मा महाडिक यांनी यावेळी केले.
महिलांचा आदर करत त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणारे हे सरकार आहे. त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी म्हणूनच मुलींना मोफत उच्च शिक्षणाची तरतूद सरकारने केली आहे. आज घराघरातील स्त्रियांच्या चेह्रयावर हसू व त्यांच्या मनाला बळ देण्यासाठी महायुती झटते आहे. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महिलांच्या जगण्याचा दर्जा सुधारण्यासाठी अमल महाडिक सातत्याने सक्रिय आहेत.
या भागात उघड्या गटारी व सांडपाणी व्यवस्थापनाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. या मूलभूत समस्यांचा सर्वात जास्त त्रास महिलांना होतो. रोजची दैनंदिन कामे करताना यामुळे पसरलेली दुर्गंधी त्यात आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याचा विचार कुणी करत नाही. पण महाडिक यांनी याचा अभ्यास करून प्राधान्याने या समस्या सोडविण्याचे ठरविले आहे. याशिवाय मोकाट फिरण्राया कुत्र्यांचा योग्य बंदोबस्त देखील करण्यावर त्यांचा भर असणार आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या.
उपनगरातील सर्व महिलांसाठी विधायक उपक्रम राबवत त्यांच्या सबलीकरणासाठी आम्ही नेहमीच कार्यरत राहिलो आहोत. केवळ प्रशिक्षण नव्हे तर विविध स्पर्धा व प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना व्यासपीठ सुद्धा दिले आहे. यापुढेही देत राहू. महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी म्हणून उपक्रम राबवले आहेत. हा समाज कार्याचा वारसा सदोदित सुरु ठेवण्यासाठी अमल महाडिक यांना निवडून द्या. 20 नोव्हेंबर रोजी अनुक्रमांक 1 समोरील कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना मताधिक्क्याने विजयी करा. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी माजी नगरसेविका माधुरी किरण नकाते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रेखा उगवे, प्रियांका पाटील, वंदना आवळे, गीता पाटील यांच्यासह परिसरातील महिलांनी संवाद साधला.