महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्पाईसजेट आगामी काही महिन्यात 250 दशलक्ष उभारणार

06:46 AM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

स्पाईसजेट एअरलाइन आपल्या कामकाजाचा विस्तार करण्याच्या दिशेने काम करत आहे आणि येत्या काही महिन्यात सुमारे 250 अमेरिकन दशलक्ष डॉलर जमा करणार असल्याची माहिती एअरलाइन्सचे प्रमुख अजय सिंग यांनी बुधवारी दिली आहे.

Advertisement

सिंग हे राष्ट्रीय राजधानीत आयोजित ‘सीएपीए इंडिया एव्हिएशन समिट’मध्ये बोलत होते. विमान कंपनीला भाडेकरू आणि कर्जाच्या समस्यांसह अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. सिंग म्हणाले की, विमान कंपनीला अचानक आलेल्या समस्या आणि त्याचा परिणाम जाणवत आहे. ते म्हणाले, स्पाईसजेटला संपवणे कठीण आहे आणि आम्ही समस्यांना तोंड देत त्या सोडवण्याला प्राधान्य देत आहोत.

दोन तिमाहीत एअरलाईन्सची स्थिती सुधारणार

विमान कंपनीने येत्या काही महिन्यांत 250 दशलक्ष डॉलर उभारण्याची योजना आखली असून कंपनीचे भविष्य खूप उज्ज्वल आहे, असेही सिंग यांनी सांगितले.

कंपनीने सध्याला काही विमाने भाड्याने घेतली आहेत. आम्ही आमच्या ताफ्याचा विस्तार करू. या संदर्भात आम्हाला सर्व शक्य पावले उचलण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article