महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

250 वर्ष जुन्या मृतदेहासोबत घालवितात वेळ

06:18 AM Oct 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

करत नाहीत अंत्यसंस्कार

Advertisement

कुठलाही व्यक्ती स्वत:च्या मृत नातेवाईकाच्या शरीराच्या अवशेषांसोबत वेळ व्यतित करू शकतो का? हा प्रकार ऐकूनच भीतीदायक वाटतो. परंतु जगात असे लोक आहेत, जे स्वत:चे नातेवाईक किंवा स्वकीयांचे मृतदेह सुरक्षित ठेवतात आणि त्याच्यासोबत वेळ व्यतित करतात.

Advertisement

इंडोनेशियाच्या पापुआ प्रांतात काही असे आदिवासी समुदाय आहेत, ज्यांच्या परंपरा अत्यंत विचित्र आहेत. हे लोक प्रथम स्वत:च्या समुदायाच्या वृद्ध प्रमुखाच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करत नाहीत. तसेच हे मृतदेह जाळले जात नाहीत तसेच दफनही केले जात नाहीत. स्वत:च्या पूर्वजांच्या मृतदेहांना धूराद्वारे ते संरक्षित ममीचे स्वरुप देतात, हे मृतदेह शेकडो वर्षांपर्यंत सुरक्षित राहतात.

पापुथमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायचे नाव दानी आहे. हा समुदाय दीर्घकाळापासून स्वत:च्या मृत नातेवाईकांच्या मृतदेहांना ममीचे स्वरुप देत त्याच्यासोबत वेळ व्यतित करतात. इंडोनेशियायच पापुआ प्रांतील वोगी गावात दानी आदिवासी समुदाय राहतो. हे लोक स्वत:च्या पूर्वजांची ममी संरक्षित करण्यासाठी वेगळी झोपडी तयार करत ती ठेवतात आणि याच्या रक्षणात ते रात्री तेथे जाऊन झोपतात.

या आदिवासींनी स्वत:च्या 250 वर्षे जुन्या पूर्वजांचे मृतदेह धुराने काळे करत त्याला ममीचे स्वरुप देत अद्याप सुरक्षित ठेवले आहेत. बहुतांश संरक्षित मृतदेह त्यांच्या समुदायांच्या प्रमुखांचे आहेत. ममी तयार करण्याची जुनी दानी परंपरा संरक्षित करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. दानी आदिवासी स्वत:च्या लोकांच्या मृतदेहांना धूरासोबत संरक्षित करून ठेवतात. या ममींना पंख, डुकराचे दात आणि वेगवेगळ्या गोष्टींनी सजवितात. मग ज्या झोपडीत या ममी ठेवल्या जातात तेथे आग पेटविली जाते आणि याला ‘होनाई’ या नावाने ओळखले जाते.

ममी तयार करण्याची पद्धत

मृतदेहांना ममीचे स्वरुप देण्यापूर्वी दानी लोक प्रथम त्याला उन्हात सुकवितात, मग एका गुहेत नेऊन लपवितात. यानंतर मृतदेहाला तप्त धूराच्या संपर्कात ठेवले जाते आणि मृतदेहात छिद्र पाडून त्यातील द्रवपदार्थ बाहेर काढला जातो. या पूर्ण प्रक्रियेत महिने लागतात

मिळतो पूर्वजांचा आशीर्वाद

पूर्वजांचे मृतदेह संरक्षित करून त्यांना स्वत:सोबत ठेवल्याने त्यांचा आशीर्वाद मिळतो असे दानी लोकांचे मानणे आहे. यामुळे समृद्धी आणि संपन्नता वाढते असेही त्यांचे मानणे आहे. दानी आदिवासी या संरक्षित मृतदेहांना एखाद्या भ्रूणापणे मोडून एका झोपडीत ठेवतात. याच्या रक्षणासाठी लोक त्या झोपडीत दिवसरात्र जात असतात.

प्रथा संपुष्टात येण्याच्या मार्गावर

दानींदरम्यान मृतदेह संरक्षित करून ठेवणे एकेकाळी सर्वसामान्य बाब होती. परंतु 30-50 वर्षांपूर्वी या क्षेत्रात ख्रिश्चन मिशनरीज सुरू झाल्याने या लोकांना मृतदेहांना ममीचे स्वरुप देण्याऐवजी दफन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येऊ लागले. यामुळे हळूहळू ही प्रथा संपुष्टा येत आहे. आता केवळ 6-7 ममीच शिल्लक राहिल्या आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article