For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एकाहून अधिक टप्प्यांमध्ये ‘नीट’ शक्य

07:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
एकाहून अधिक टप्प्यांमध्ये ‘नीट’ शक्य
Advertisement

सीयुईटी विषयांमध्ये कपात : मोठ्या बदलांची तयारी : समितीचा अहवाल सरकारकडे

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

राष्ट्रीय परीक्षा एजेन्सीच्या (एनटीए) कामकाजाच्या समीक्षेसाठी स्थापन उच्चस्तरीय समितीने स्वत:चा अहवाल केंद्र सरकारला सोपविला आहे. कर्मचारी आणि परीक्षा केंद्रांचे आउटसोर्सिंग कमीतकमी करणे, अधिकाधिक प्रवेश परीक्षांना ऑनलाइन आयोजित करणे आणि नीट प्रमुख प्रवेश परीक्षांमध्ये प्रयत्नांच्या संख्येला मर्यादित करण्यासारख्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. समितीकडून नीट अनेक टप्प्यांमध्ये आयोजित करण्याची शिफारस  करण्यात आल्याचे मानले जातेय. केंद्र सरकारने 21 ऑक्टोबर रोजी इस्रोचे माजी प्रमुख आर. राधाकृष्णन यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अंतिम अहवाल सोपविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून दोन आठवड्यांची मुदत मागितली होती. हा अहवाल आता सरकारला सादर झाला असून एनटीएचे कामकाज आणि प्रवेश परीक्षांच्या आयोजनांना सुव्यवस्थित करण्यासाठी शिफारसी करण्यात आल्या आहेत.

Advertisement

ऑफलाइन परीक्षा कमी करत ऑनलाइन मोड शक्य नसल्यास ‘हायब्रिड’ परीक्षांचा पर्याय अनुसरला जावा अशी शिफारस समितीने केल्याचे समजते. याचबरोबर वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट समवेत प्रमुख परीक्षांमध्ये प्रयत्नांची संख्या मर्यादित करणे आणि परीक्षांची शुचिता प्रभावित होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी ‘आउटसोर्स’ कर्मचारी आणि केंद्रांची भूमिका कमी करण्यासारख्या शिफारसी करू शकते. समितीने व्यापक स्तरावर परीक्षा आयोजित करण्यात सामील जटिलता, जोखीम व सुरक्षा उपायांवरून 22 बैठका घेतल्या आहेत. समितीने विद्यार्थी व पालकांसमवेत संबंधित घटकांकडून सूचना मागविल्या होत्या आणि प्राप्त 37,000 हून अधिक सूचनांवर विचार केला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट व पीएचडी प्रवेश परीक्षा नेटमध्ये कथित अनियमिततांवरून केंद्राने जुलै महिन्यात या समितीची शिफारस केली होती. समितीने कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रेस टेस्ट म्हणजेच सीयूईडीच्या परीक्षेवरून विषयांना कमी करण्याचा सल्ला दिला आहे.

एनटीएकडून आयोजित होणाऱ्या परीक्षा

नीट, जेईई मेन, युजीसी नेट, सीएसआयआर युजीसी नेट, सीयूईटी यूजी आणि पीजी, एआयएपीजीईटी, निफ्ट, सीमॅट

करण्यात आलेल्या सूचना...

  • ऑफलाइन परीक्षांना कमी करावे, ऑनलाइन मोड शक्य नसल्यास हायब्रिड (ऑनलाइन आणि ऑनलाइन पेन पेपर मोड) परीक्षांचा पर्याय असावा. जेथे ऑनलाइन परीक्षा शक्य नाही तेथे प्रश्नपत्रिकांना डिजिटल मोडमध्ये पाठवावे. उत्तर पत्रिका ओएमआर शीटवर असावी.
  • जेईई मेनप्रमाणे नीट देखील एकाहून अधिक टप्प्यांमध्ये आयोजित केली जावी.
  • वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट समवेत प्रमुख परीक्षांमध्ये सहभागी होण्याच्या प्रयत्नांची संख्या मर्यादित केली जावी.
  • आउटसोर्सिंग कर्मचाऱ्यांची भूमिका कमी केली जावी. आउटसोर्सिंग करणाऱ्या खासगी केंद्रांची संख्या कमी करावी.
  • सीयूईटीच्या परीक्षेत विषयांची संख्या कमी करण्यात यावी.
  • एनटीएमध्ये स्थायी कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी.
Advertisement
Tags :

.