महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भरधाव कारची दुभाजकला धडक, तरुण ठार

12:57 PM Dec 02, 2024 IST | Pooja Marathe
Speeding car hits a divider, kills young man
Advertisement

एक जखमी , मृत उरुण-इस्लामपूरचा तावडे हॉटेल येथील घटना
कोल्हापूर

Advertisement

धाव कार दुभाजकाला धडकल्याने झालेल्या भिषण अपघातामध्ये एक तरुण जागीच ठार झाला तर अन्य एकजण जखमी झाला. बाळकृष्ण शंकर पवार (वय 38, रा. शाहूनगर रिंगरोड, उरुण-इस्लामपूर, जि. सांगली) असे मृताचे नाव असून, अंकुश भगवान पाटील (वय 34, रा. इस्लामपूर) हा जखमी झाला आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास तावडे हॉटेलजवळ हा अपघात घडला. या घटनेची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली. फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल गुलाब सनदी यांनी दिला.
सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरातील बाळकृष्ण पवार हे मित्रांना सोडण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा कोल्हापुरात येत होते. चालक अंकुश पाटील हे अलिशान कार चालवत होते. महामार्गावर पंचगंगा नदीवरील पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झालेले पवार यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जखमी पाटील यांच्यावर उपचार करण्यात आपले. इतर दोन मित्र किरकोळ जखमी झाले. पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अपघाताची नोंद गांधीनगर पोलीस ठाण्यात झाली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article