सराफ व्यावसायिकाला सहा कोटींचा गंडा
कोल्हापूर :
भागीदारीत सुरु केलेल्या सराफी व्यवसायात एका सराफाने भांडवल म्हणून 12 किलो सोन्याची गुंतवून केली. या गुंतविलेल्या सोन्याची आणि व्यवसायातील नफ्याच्या हिशोबाच्या वाटणीची 3 किलो 600 ग्रॅम असा सुमारे 6 कोटी रुपये किंमतीच्या 15 किलो 600 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिण्याची विक्री कऊन, एका भागीदाराने दुसऱ्या भागीदाराला गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या फसवणूक प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात अनिल देवीचंद ओसवाल (रा. प्रतिभानगर, कोल्हापूर) या सराफ व्यावसायिकाविरोधी मंगळवारी गुन्हा दाखल झाला. यामुळे शहरातील सराफ व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याची फिर्याद गिरीश कांतीलाल शहा (वय 64, रा. मोती निवास, रुईकर कॉलनी, कोल्हापूर) या सराफ व्यावसायिकाने दिली आहे.
फिर्यादी गिरीश शहा आणि संशयीत अनिल ओसवाल या दोघा सराफी व्यावसायिकानी भागीदारामध्ये शहरातील गुजरी पेठ येथे मे गिरीश गोल्ड या नावे सराफी दुकान सुऊ कऊन, सोने व चांदीच्या दागिन्यांचे उत्पादन, खरेदी व विक्री कऊ लागले. या भागीदारीच्या व्यवसायात शहा यांनी 12 किलो सोने भाडवल म्हणून गुंतविले होते. तसेच या दोघामध्ये एक करार सुध्दा करण्यात आला होता. असे असताना संशयीत अनिल ओसवाल याने शहा यांनी गुंतविलेल्या 12 किलो सोन्याच्या दागिण्यासह या दागिन्यांवर करारपत्राप्रमाणे वाटणीला येणारी 3 किलो 600 ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे 6 कोटी रुपये किंमतीच्या 15 किलो 600 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दागिण्याची विक्री कऊन, त्याची परस्पर विक्री करुन, त्यातून मिळालेल्या पैश्यातून संशयीत ओसवाल याने स्थावर व जंगम मालमत्ता खरेदी करीत, काही पैसे शेअर्समध्ये गुंतवणूक केली. तर काही पैसे बँकेमध्ये ठेवी ठेवून, फिर्यादी शहा यांचा विश्वासघात करुन, सुमारे 6 कोटी रुपये किंमतीच्या 15 किलो 600 ग्रॅम सोन्याचा अपहार कऊन गंडा घातला.
याबाबत फिर्यादी शहा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशाने या तक्रारीची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी चौकशी केली. चौकशीअंती या फसवणूकीविषयी संशयीत ओसवाल याच्या विरोधी मंगळवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.