महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रालोआचे नेते आज राष्ट्रपतींना भेटणार : शनिवारी किंवा रविवारी शपथविधी शक्य

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भाजपच्या नेतृत्वाखाली ‘रालोआ’ने सलग तिसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत, तर एनडीएला 292 जागा मिळाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून सर्वांच्या नजरा नव्या सरकारच्या स्थापनेकडे लागल्या आहेत. शुक्रवारी भाजप संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर रालोआचे नेते राष्ट्रपतींची भेट सत्तास्थापनेचा दावा करणार असून त्यानंतर राष्ट्रपती भवनाकडून शपथविधी सोहळ्याचा कार्यक्रम निश्चित होईल. सद्यस्थितीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवे सरकार रविवार, 9 जून रोजी शपथ घेणार असल्याचे सूत्रांकडून समजते. तथापि, शनिवारी शपथविधी होईल अशी चर्चाही दिल्लीदरबारी असली तरी निश्चित वेळ शुक्रवारीच राष्ट्रपती भवनकडून जाहीर होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन रालोआ सरकार निर्मितीसाठी घटक पक्षांच्या खासदारांची बैठक शुक्रवारी होणार आहे.

लवकरच सरकार स्थापन करण्याचा आग्रह

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर बुधवार, 5 जून रोजी संध्याकाळी उशिरा एनडीएमधील घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे. पी. न•ा, राजनाथ सिंह, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, टीडीपीचे सुप्रीमो चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान आणि इतर नेते सहभागी झाले होते. सर्वांनी एकमताने नरेंद्र मोदी यांची ‘एनडीएचे नेते’ म्हणून निवड केली होती. याप्रसंगी नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी लवकरात लवकर नवीन सरकार स्थापन करण्याचा आग्रह व्यक्त केला होता. नवीन सरकारच्या स्थापनेत कोणताही विलंब होता कामा नये आणि हे काम लवकरात लवकर व्हायला हवे, असे नितीशकुमार म्हणाले होते.

शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधीचे निमंत्रण

मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील नवे सरकार स्थापन होणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर शेजारी देशांच्या राष्ट्रप्रमुखांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. भारताने या सोहळ्यासाठी 5 शेजारी देशांच्या नेत्यांना आमंत्रित केले आहे. यामध्ये श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, नेपाळचे पंतप्रधान प्रचंड, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आणि मॉरिशस आणि भूतानच्या नेत्यांचा समावेश आहे. यापैकी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे हे दोघे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. शेख हसीना शुक्रवारी संध्याकाळीच भारतात दाखल होणार असल्याचे बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले. 2019 मध्ये व्हीव्हीआयपींसह देश-विदेशातील 8,000 हून अधिक पाहुणे पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.

मंत्रिपदांबाबत चर्चा सुरू

एनडीएच्या बैठकीनंतर घटक पक्षांनी मंत्रालयाची मागणी सुरू केली आहे. नितीशकुमार यांनी रेल्वे मंत्रालयाची मागणी केली आहे, तर चंद्राबाबूंनी सभापतीपदाची मागणी केली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत भाजपने जिंकलेल्या सर्व मंत्र्यांची यावेळीही पुनरावृत्ती होणार आहे. मंत्रिपदाच्या यादीतून वादाशी संबंधित चेहऱ्यांची नावे हटवली जाऊ शकतात. तथापि, निवडणुकीत पराभूत झालेल्या स्मृती इराणी आणि राजीव चंद्रशेखर यांना पक्ष आणखी एक संधी देऊ शकतो. त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळू शकते.

भाजपाध्यक्षांच्या निवासस्थानी बैठक

दिल्लीतील भाजप अध्यक्ष जे. पी. न•ा यांच्या निवासस्थानी गुरुवारी एक महत्त्वाची बैठक झाली. त्यात अमित शहा आणि राजनाथ सिंहही उपस्थित होते. या बैठकीत नवे सरकार स्थापन करणे, भाजप आणि मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देणे आणि शपथविधीची तयारी यासह अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे.

भाजपला 14 मित्रपक्षांच्या 53 खासदारांचा पाठिंबा

लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागा मिळाल्या आहेत. बहुमताच्या आकड्यापेक्षा (272) ही संख्या 32 ने कमी आहे. मात्र, एनडीएने 293 जागांसह बहुमताचा आकडा पार केला. एनडीएकडे भाजपशिवाय 14 मित्रपक्षांचे 53 खासदार आहेत. चंद्राबाबूंचा टीडीपी 16 जागांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असून नितीशकुमारांचा जेडीयु 12 जागांसह तिसऱ्या क्रमांकाचा  आहे. भाजपसाठी यावेळी दोन्ही पक्ष आवश्यक आहेत. त्यांच्याशिवाय भाजपला सरकार बनवणे अवघड आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article