अरुणाचलमध्ये शिंग असणारा बेडूक
स्थानिक समुदायावर आधारित मिळाले नाव
ईशान्येतील राज्य अरुणाचल प्रदेशमध्ये बेडकाची नवी प्रजाती आढळून आली आहे. या बेडकाला शिंग आहेत. अरुणाचल प्रदेशच्या टेल वन्यजीव अभयारण्यात हा बेडुक आढळून येतो. भारतीय प्राणी सर्वेक्षणाच्या (झेडएसआय) वैज्ञानिकांनी याचा शोध लावला आहे. या बेडकाचे नाव स्थानिक समुदाय अपनातीच्या नावावर जेनोफ्रीस अपतानी ठेवण्यात आले आहे. याला शोधणाऱ्या टीमचे नेतृत्व विक्रमजीत सिन्हा आणि भास्कर सायकिया यांनी केले. त्यांच्यासोबत के.पी. दिनेश, ए. शबनम आणि इलोना जसिंथा खाकरोंगर हेते.जेनोफ्रीस अपतानीचा शोध भारताची समृद्ध जैवविविधता समोर आणते. बेडकाच्या नव्या प्रजातीचे नाव अरुणाचल प्रदेशच्या अपतानी समुदायाच्या नावावर आधारित आहे. हा समुदाय सुबनसिरी खोऱ्यात राहतो. येथेच टेल वन्यजीव अभयारण्य आहे. हा बेडुक पूर्व हिमालयन आणि इंडो-बर्मा जैवविविधता असलेल्या भागात आढळून येतो.
अऊणाचल प्रदेशातील टेल अभयारण्य समृद्ध जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे. यात अनेक प्रकारच्या उभयचर जीवांच्या प्रजाती सामील आहेत. टेल येथून अलिकडच्या काळात शोधण्यात आलेली बेडकांची ही पाचवी नवी प्रजाती आहे. 2017 मध्ये ओडोरोना अरुणाचलेंसिसचा शोध लावण्यात आला होता. तर 2019 मध्ये लिउराना बेडकांच्या तीन नव्या प्रजाती शोधण्यात आल्या होत्या. टेलबरोबरच संशोधकांनी 2022 मध्ये पश्चिम अरुणाचल प्रदेशातून कॅस्केड बेडकाच्या तीन नव्या प्रजातींचा शोध लावला होता. पश्चिम कामेंग जिल्ह्यातील सेसा आणि दिरांग येथू अमोलोप्पस टेराओर्किस आणि अमोलोप्स चाणक्य तर तवांग जिल्ह्याच्या जंग-मुक्तो रोड येथू अमोलोप्स तवांग या प्रजातींचा शोध लागला होता.