कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

।।लोकशक्तिरविशिषयते।।

03:17 PM Mar 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

योजनांचा पाऊस, डॉ. प्रमोद सावंत यांचा करवाढ विरहित अर्थसंकल्प

Advertisement

ठळक मुद्दे...

Advertisement

असा आहे अर्थसंकल्प

पणजी : कोणत्याही कर वाढीशिवाय, त्याचबरोबर प्रचंड सवलतींचा वर्षाव करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा गोव्याचा 28,162 कोटी रुपयांचा आणि त्याचबरोबर 1423 कोटी रुपये शिलकीचा अर्थसंकल्प काल बुधवारी विधानसभेत सादर केला. पर्यटन उद्योगाला उभारी देण्यासाठी अनेक विविध योजना जाहीर केल्या. शिरगावची देवी श्रीलईराईची जत्रा व मडगावच्या दिंडी महोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा घोषित केला. आदिवासी समाजाच्या विकासासाठी 1480 कोटीची तरतूद, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्ती योजना, वीज खात्यासाठी 41 31 कोटी रुपयांची विशेष तरतूद, तिसऱ्या जिल्ह्याच्या निर्मितीचे सोपस्कर पूर्णता, ‘मिशन कर्मयोगी’ नवी योजना, अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे. यंदाचा हा अर्थसंकल्प मुख्यमंत्र्यांनी आपल्या कारकीर्दीतला सातवा अर्थसंकल्प सादर करताना गोव्याचा सर्वांगीण विकास आणि ‘लोकशक्तिरविशिषयते’ ही भावना समोर ठेवून रोजगाराभिमुख धोरण जाहीर केले.

आपल्या पावणे दोन तासाच्या भाषणाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी

मनसमर्पित तन समर्पित

और यह जीवन समर्पित

चाहता हूँ देश की धरती

तुझे कुछ और भी दूँ !

या वाक्याने केली, तर भाषणाचा समारोप

जे का रंजले गांजले

त्यासी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणावा !

या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी दाखवलेला मार्ग ही आपली प्रेरणा आहे आणि आपल्या प्रशासनाची मार्गदर्शक नीती आहे. केवळ धोरण व योजना आखून चालणार नाही, तर त्यांची रितसर अंमलबजावणी झाली पाहिजे, याचे भान राखूनच आपण प्रशासन कार्यरत ठेवलेले आहे असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. आपल्याला मुख्यमंत्री या नात्याने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी गोमंतकीय जनतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपण नतमस्तक होत असल्याचे मराठीतून निवेदन केले.

कर्जाच्या हप्त्यांबाबत चिंता व्यक्त

राज्यावरील कर्ज वाढलेले आहे. खुल्या मार्केटमध्ये दहा वर्षांपूर्वी जे कर्ज घेतले होते त्यामुळे त्यातून वार्षिक 1504 कोटी रुपयांचा मूळ हप्ता भरावा लागणार आहे. सध्या आठशे कोटी रुपये वार्षिक हप्ता भरला जातो. त्यामध्ये आता अतिरिक्त 704 कोटी रुपयांची भर पडली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी थोडी चिंता व्यक्त केली.

केंद्राकडून सर्वाधिक मोठे आर्थिक सहाय्य

आपले सरकार हे डबल इंजिनवाले सरकार असून त्यामुळे केंद्र सरकारकडून एक हजार पाचशे वीस कोटी ऊपयांचे विशेष आर्थिक सहाय्य प्राप्त होईल आणि आतापर्यंत गोव्याच्या इतिहासातील हे सर्वाधिक सहाय्य ठरणार आहे. यावर्षी देखील अशाच पद्धतीचे विशेष आर्थिक सहाय्य केंद्राकडून मुख्यमंत्र्यांनी अपेक्षित केले. इसवी सन 2023-24 या आर्थिक वर्षी 1423 कोटी रुपये अतिरिक्त महसूल प्राप्त झाला होता. यंदाच्या अर्थसंकल्पात 2403 कोटी रुपयांचा शिलकी महसूल मुख्यमंत्र्यांनी नमूद केला आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात गोवा सरकारने 1050 कोटी रुपयांची कर्जे घेतलेली आहेत.

गोव्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ

गोव्याचे दरडोई उत्पन्न वाढले असून 2025-26 या आर्थिक वर्षात ते 1 लाख 38 हजार 624 रुपये एवढे अंदाजित केले आहे. ही वाढ 14.27 टक्क्यांनी अपेक्षित धरली आहे. राज्यावर कर्जाचा बोजा असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात मान्य केले. एकूण अर्थसंकल्पामध्ये 27993. 97 कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित असल्याचे म्हणाले. वर्ष 2024-25 च्या तुलनेत 13 टक्क्यांनी महसूल वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. एकूण खर्च 28 हजार 162 कोटी रुपयांचा होईल या अनुषंगाने तयार केलेला हा अर्थसंकल्प आहे. त्यातील 20299 कोटी रुपयांचा खर्च हा महसूली खर्च आहे तर 7863 कोटी रुपये खर्च हा भांडवली खर्च होईल.

लईराईची जत्रा,मडगावची दिंडी राज्योत्सव

देवी लईराईची जत्रा आणि मडगावातील दिंडी उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या अंतर्गत या उत्सवांमध्ये सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा सरकारतर्फे उपलब्ध करून दिल्या जातील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article