For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्ट्र सरकारकडून सीमावासियांसाठी विशेष अधिकारी

11:24 AM Feb 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
महाराष्ट्र सरकारकडून सीमावासियांसाठी विशेष अधिकारी
Advertisement

शिनोळी येथे नोडल अधिकारी लवकरच कार्यरत

Advertisement

बेळगाव : सीमा समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांच्या आदेशानुसार शिनोळी येथे नोडल अधिकारी नेमण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांना समन्वय विशेष अधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा आदेश बजावला आहे. महसूल व वन खात्याचे अप्पर सचिव सुरेश नाईक यांनी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती केली असून या महिना अखेर  शिनोळी येथे ते ऊजू होणार आहेत. त्यामुळे सीमाभागातील नागरिकांना आपल्या समस्या तसेच तक्रारी या अधिकाऱ्यासमोर मांडता येणार आहेत. सीमाभागातील शालेय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी महाराष्ट्रात प्रवेश घेण्याबरोबरच इतर कामकाजासाठी कोल्हापूर येथे धावपळ करावी लागत होती. बेळगावजवळील शिनोळी या गावामध्ये विशेष अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने समन्वय मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांनी कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अधिकारी नेमण्याचा आदेश बजावण्यात आला आहे.

शिनोळी ग्राम पंचायतीमध्ये बैठक

Advertisement

शिनोळी ग्राम पंचायत येथे नायब तहसीलदार दर्जाचा नोडल अधिकारी नियुक्त केला जाणार आहे. गडहिंग्लज प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी नोडल अधिकारी नेमणूक केला जाणार असल्याचे सांगितले. शिनोळी ग्राम पंचायत कार्यालयामध्ये रविवारी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे व चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. फेब्रुवारी अखेरपर्यंत नोडल अधिकारी ऊजू होणार असून सीमाभागातील नागरिकांना आरोग्य, शिक्षण व इतर सुविधांसाठी ते समन्वयक म्हणून कार्यरत असणार असल्याची माहिती प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. या बैठकीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुस्कर, सागर पाटील व इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.