For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून शहर पोलीस ठाण्यात झाडाझडती !

03:24 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून शहर पोलीस ठाण्यात झाडाझडती
Advertisement

                       सांगली पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची विशेष बैठक

Advertisement

सांगली : सांगली जिल्ह्यात विशेषतः सांगली, मिरज शहरात सातत्याने होणारे खून, खुनाचा प्रयत्न यासह ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल सांगलीच्या जनतेची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दोन्ही शहरातील अधिकाऱ्यांची चांगलीच शाळा घेत बेसिक पोलिसिंगचे धडे दिले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडतीही घेतली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी शनिवारी रात्री सांगली शहर पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी मिरजेत खुनातील संशयितावर हल्ल्याचा प्रयत्न, सांगलीत दलित महासंघाच्या अध्यक्षाचा खून, जेलमधून खुनातील संशयिताचे पळायन यासह अन्य गुन्ह्याची माहिती घेत विविध उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.

Advertisement

प्रतिबंधात्मक कारवाया, सराईत गुन्हेगारांबर बाँच, हद्दपारी, मोका यासह विविध प्रकारच्या कारवाया तातडीने करण्याच्या सूचना महानिरीक्षक फुलारी यांनी यावेळी दिल्या. सांगली, मिरजेसारख्या शहरात व्हिजिबल पोलिसिंग कोठेही दिसून येत नसल्याबाबत झाडाझडती घेतली. व्हिजिबल पोलिसिंग जनतेला दिसायला हवे. त्यातून नागरिकांना आपण सुरक्षित असल्याची भावना निर्माण होईल असे काम करा अशा सूचनाही दिल्या.

यावेळी सांगलीचे पोलीस उपाधीक्षक संदीप भागवत, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिल गिल्डा, एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक सतिश शिंदे, सांगली शहरचे निरीक्षक अरुण सुगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.