महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आषाढी वारीसाठी विशेष एक्स्प्रेस

11:07 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर-पंढरपूर एक्स्प्रेस15-16 रोजी धावणार 

Advertisement

बेळगाव : नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने वारकऱ्यांच्या सोयीसाठी बेंगळूर-पंढरपूर या मार्गावर दोन विशेष रेल्वे सोडल्या आहेत. दि. 15 व 16 जुलै रोजी या एक्स्प्रेस धावणार असल्याने बेळगावसह हुबळी, खानापूर, लोंढा, गोकाक रोड, घटप्रभा, रायबाग, चिंचली, कुडची, उगार खुर्द येथील वारकऱ्यांना आषाढी एकादशी दिवशी होणाऱ्या यात्रेमध्ये सहभागी होणे सोयीचे होणार आहे.

Advertisement

रेल्वे क्र. 06295 ही एक्स्प्रेस 15 रोजी रात्री 10 वाजता बेंगळूर येथून निघणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता बेळगावला येणार आहे. त्याच दिवशी सायंकाळी 6.20 वाजता पंढरपूरला पोहोचेल. रेल्वे क्र. 06296 ही एक्स्प्रेस 16 रोजी सायंकाळी 8 वाजता पंढरपूर येथून निघालेली एक्स्प्रेस रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी बेळगावला पोहोचणार आहे. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 12.30 वाजता बेंगळूरला पोहोचेल.

रेल्वे क्र. 06297 ही एक्स्प्रेस 16 रोजी रात्री 10 वाजता बेंगळूर येथून निघणार असून सकाळी 10 वाजता बेळगावला पोहोचेल. तर त्याचदिवशी सायंकाळी 6 वाजून 20 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल. परतीच्या प्रवासात बुधवार दि. 17 रोजी रेल्वे क्र. 06298 एक्स्प्रेस रात्री 8 वाजता पंढरपूर येथून निघणार असून मध्यरात्री 1.15 वाजता बेळगावला पोहोचेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 3.10 वाजता बेंगळूरला पोहोचेल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article