महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सभापती तवडकर यांच्या कारला झुवारी पुलावर अपघात

12:44 PM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : काणकोणहून पर्वरीला येताना सभापती रमेश तवडकर यांच्या कारला बुधवारी नवीन झुवारी पुलावर अपघात झाला. भर वेगात असलेल्या कारचे स्टेअरिंग लॉक झाल्यामुळे कारची झुवारी पुलाच्या कठड्याला धडक बसली. मात्र एअरबॅग उघडल्यामुळे सुदैवाने सभापतींसह कारमधील सर्व सहाजण बचावले. सदर कारमध्ये सभापतेंसह एकूण सहाजण होते. पुलाच्या कठड्याला कारची धडक बसल्यानंतर कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या. त्यामुळे कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. दरम्यान, नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले आम्ही सगळे प्रवासी एका मोठ्या दुर्घटनेतून वाचलो, अशी प्रतिक्रिया रमेश तवडकर यांनी दिली.

Advertisement

श्री विठ्ठलाच्या कृपेनेच बचावलो!

Advertisement

अपघाताची घटना बुधवार दि. 17 जुलै रोजी घडली, होती मात्र याबाबत सभापतीनीं चांगलीच गुप्तता बाळगली होती. अखेर गुऊवारी दुपारी अपघाताबाबतची माहिती उघड झाली. त्यांची विचारपूस करायला त्यांना फोन येऊ लागले. अपघात आषाढी एकादशीच्या दिवशी झाला. या अपघातातून आम्ही सर्वजण सुखरूपपणे बचावलो. ही श्री विठ्ठलाचीच कृपा झाली, अशी भावना सभापती तवडकर यांनी व्यक्त केली. आपली कार या मार्गावर ताशी 100 ते 110 किमी वेगाने धावते. पण बुधवारी ती ताशी 70 किमी वेगात होती. वेग अधिक असता तर कठड्याला धडकून कार नदीतही पडण्याची शक्यता होती, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, इतक्या मोठ्या अपघातातून सुदैवाने बचावल्यानंतर सभापती तवडकर विधानसभेत दाखल झाले व अपघाताचा कोणताही ताण न घेता नेहमीनुसारच कामकाज सुरू केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article