For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत व्हेज मराठा

12:28 PM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
हॉटेलसारखी चमचमीत  झणझणीत व्हेज मराठा
Advertisement

नेहमी घरच्या त्याच-त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन खूप कंटाळा येतो. अशा वेळी काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी खाण्याची इच्छा होते. अशा वेळी एकतर तुम्ही हॉटेलमधून काहीतरी वेगळी भाजी ऑर्डर करता किंवा यूट्यूब व्हिडीओ बघून घरी बनवण्याचा प्रयत्न करता. पण, अशाने एकच दिवस तुम्हाला चमचमित भाजी खाल्ल्याचा आनंद मिळतो. पण, आज आम्ही तुम्हाला अशी एक रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही घरच्या घरी करु शकता. आतापर्यंत तुम्ही हॉटेलमध्ये खाल्लेली व्हेज डीश म्हणजेच ‘व्हेज मराठा’ आता घरच्या घरी करा.

Advertisement

व्हेज मराठा साहित्य

  • कोप-ता साहित्य
  • ३-४ उकडलेले बटाटे
  • कोबी
  • २ गाजर
  • मका दाणे वाफवलेले
  • फरसबी
  • पनीर
  • २ चमचे बेसन
  • काॅनप-लोवर
  • मैदा
  • तळण्यासाठी तेल
  • मीठ
  • लाल तिखट
  • जीरे
  • गरम मसाला
  • ग्रेव्ही साहित्य-
  • ३-४ टाॅमेटो
  • २ कांदे
  • ७-८ काजू
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • तेल
  • धणे
  • लाल तिखट
  • मीठ चवीनुसार
  • तमालपत्र, जीरे
  • आलं
  • पाणी

व्हेज मराठा कृती

Advertisement

स्टेप

प्रथम ग्रेव्ही बनवण्यासाठी एका पॅनमध्ये थोडे तेल गरम करून त्यात मोठे मोठे उभे चिरलेले कांदे, ७-८ सोललेल्या लसूण पाकळ्या, ३-४ टॉमेटोचे मोठे मोठे तुकडे चांगले तेलात लालसर परतवून हे सर्व मिश्रण थंड होऊ देणे. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांडयात काढून त्यात धणे घालून थोडे पाणी घालून हे मिश्रण चांगले वाटून घ्यावे.

स्टेप
नंतर एका भांड्यात तेल गरम करून तमालपत्र जिऱ्याची फोडणी देऊन त्यात हे वाटप ओतावे. वरून हळद, लाल तिखट गरम मसाला घालून चांगले तेलात परतवून घ्यावे. थोडे त्यात पाणी टाकून एक दोन उकळी येईपर्यंत व ग्रेव्हीला घटृपणा येईपर्यंत नंतर गॅस बंद करावा.

स्टेप
आता कोप-तासाठी प्रथम ३-४ उकडलेले बटाटे घेऊन ते चांगले कुस्करून घ्यावे. मग त्यात वाफवलेले मक्याचे दाणे, थोडी वाफवलेली फरसबी, बारीक चिरलेला कोबी, खिसलेले गाजर, कुसकरलेले पनीर घेऊन त्यात लाल तिखट, गरम मसाला, २ चमचे बेसन, मीठ, काॅनफ्लॉवर हे सर्व मिश्रण चांगले एकत्रित करून त्याचे मध्यम आकाराचे गोळे बनवून ते मैदयात घोळवून घ्यावे.

Advertisement
Tags :

.