महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्सला 2-1 ने हरवून स्पेन अंतिम फेरीत

06:55 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्पेनचा 16 वर्षीय यामाल ठरला स्पर्धेतील गोल करणारा सर्वांत तरुण खेळाडू

Advertisement

वृत्तसंस्था/ म्युनिक

Advertisement

 

युरो, 2024 च्या फायनलमध्ये पोहोचताना विजेतेपदाच्या संभाव्य दावेदारांपैकी आणखी एकाची बाहेर रवानगी करून स्पेनचे प्रशिक्षक लुईस डे ला फुएन्टे यांनी इंग्लंड किंवा नेदरलँड्सला त्यांचा संघ आणखी सुधारू शकतो असा इशारा दिला आहे. स्पेनने फ्रान्सवर 2-1 असा विजय मिळवून युरोपियन चॅम्पियनशिपच्या निर्णायक फेरीत प्रवेश केला आहे. या सामन्यात स्पेनचा 16 वर्षीय लॅमिने यामाल हा या स्पर्धेतील गोल करणारा सर्वांत तऊण खेळाडू ठरला.

21 व्या मिनिटाला नोंदल्या गेलेल्या यामालच्या तेजस्वी क्षणापूर्वी मास्कशिवाय खेळणाऱ्या कायलियान एमबाप्पेच्या क्रॉसवर रँडल कोलो मुआनीने हेडरद्वारे गोल करून फ्रान्सला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर चार मिनिटांनी डॅनी ओल्मोने स्पेनला आघाडी मिळवून देणारा गोल केला. विक्रमी चौथ्या युरोपियन चॅम्पियनशिप विजेतेपदाचा पाठलाग करणारा स्पेन बर्लिनमध्ये रविवारी म्हणजे यामालच्या 17 व्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अंतिम फेरीत इंग्लंड किंवा नेदरलँडशी खेळेल.

 

स्पेन हा युरो, 2024 मधील सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा संघ राहिला आहे. सर्व सामने जिंकणारा आणि 13 वेळा गोल करणारा तो एकमेव संघ आहे. त्याने युरोपियन चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक गोल करण्याच्या आपल्या विक्रमाची बरोबरी केली आहे आणि फ्रान्सच्या नावावर असलेल्या एकूण गोलांच्या विक्रमाहून ते फक्त एका गोलाने मागे आहेत. फ्रान्सने सदर विक्रम 1984 मध्ये नोंदविला होता.

युरो, 2024 मध्ये फ्रान्सच्या सुऊवातीच्या गट सामन्यात नाक मोडल्यानंतर एमबाप्पे या सामन्यात प्रथमच मास्कशिवाय मैदानात उतरला तेव्हा म्युनिकमध्ये उपस्थित असलेले च्सारे आश्चर्यचकित झाले. एमबाप्पे तक्रार करत होता की, मास्क त्याला अडथळा ठरतो आणि तो काढून टाकल्याचा तत्काळ परिणाम दिसून आला. कारण त्याने नवव्या मिनिटाला सुरुवातीला गोलसाठी संधी निर्माण केली. त्याने दिलेल्या क्रॉसवर रँडल कोलो मुआनीने हेडर मारून हा गोल केला. पण 21 व्या मिनिटाला यामालने अप्रतिम बरोबरीचा गोल करताना 25 यार्ड्सवरून चेंडू फटकावला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article