For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुनीता विलियम्स शिवाय पृथ्वीवर परतले अंतराळयान

06:45 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुनीता विलियम्स शिवाय पृथ्वीवर परतले अंतराळयान
Advertisement

स्टारलायनरचे वाळवंटात लँडिंग : बिघाडामुळे  रिकामी परत आणण्याचा नासाकडून निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुश विलमोर यांना अंतराळ स्थानकावर नेणारे अंतराळयान 3 महिन्यांनी पृथ्वीवर सुरक्षितपणे उतरले आहे. 3 मोठे पॅराशूट आणि एअरबॅगच्या मदतीने याचे लँडिंग झाले. नासानुसार अंतराळयान भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी पहाटे 3.30 वाजता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून विलग झाले होते. हे यान पृथ्वीवर पोहोचण्यास सुमारे 6 तास लागले आहेत.

Advertisement

स्टारलायनरने 9 वाजून 15 मिनिटांनी पृथ्वीच्या वायुमंडळात प्रवेश केला होता. तेव्हा याचा वेग सुमारे 2,735 किलोमीटर प्रतितास इतका होता. तर सकाळी 9 वाजून 32 मिनिटांनी अमेरिकेत न्यू मेक्सिकोच्या व्हाइट सँड स्पेस हार्बरमध्ये (वाळवंटात) ते लँड झाले आहे.

बोइंग कंपनीने नासासाठी हे अंतराळयान निर्माण केले आहे. 5 जून रोजी सुनीता आणि बूच यांना याच अंतराळयानाद्वारे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठविण्यात आले होते. ही केवळ 8 दिवसांची मोहीम होती, परंतु यान सुरक्षितपणे परतण्याबद्दल अनेक प्रकारच्या शंका होत्या. अंतराळयानातील तांत्रिक अडचणी आणि हेलियम गॅसच्या गळतीची माहिती समोर आली होती. स्टारलायनरमधील सुरक्षेच्या मुद्द्यांमुळ बुच आणि सुनीता यांना त्याच्या माध्यमातून पृथ्वीवर आणले जाणार नसल्याचे नासाने 24 ऑगस्ट रोजी स्पष्ट केले होते. सुनीता आणि बुच यांना आता एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगन अंतराळयानातून पृथ्वीवर आणले जाणार आहे.

नासा अन् बोइंगमध्ये वाद

स्टारलायनरची वापसी आणि त्याच्याशी निगडित अपडेटवरून नासाने शनिवारी सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेतली आहे. यात बोइंगचा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. यामुळे नासा आणि बोइंग यांच्यात स्टारलायनवरून वाद असल्याची चर्चा रंगू लागली आहे. स्टारलायनरने उत्तमप्रकारे लँडिंग केले आहे. आम्ही हे यान तपासणीसाठी पाठविले आहे. अंतराळयानात का बिघाड झाला हे आम्ही लवकरच सांगणार आहोत असे नासाचे व्यवस्थापक स्टीव स्टिच यांनी सांगितले आहे.

नासा अन् बोइंग करणार तपासणी

नासा आणि बोइंग दोघेही मिळून स्टारलायनरची तपासणी करणा आहेत.  स्टारलायनरच्या प्रॉपल्शन सिस्टीममध्ये का बिघाड झाला आणि हेलियमची गळती कशामुळे झाली हे शोधून काढले जाणार आहे. तर अंतराळयानाच्या यशस्वी लँडिंगनंतर अंतराळयानात उपस्थित सुनीता विलियम्स यांनी आनंद व्यक्त केला आहे. नासाचा अंतराळयान रिकामी परत आणण्याचा निर्णय अत्यंत योग्य असल्याचा दावा माजी अंतराळवीर गॅरेट रीसमॅन यांनी केला आहे. रीसमॅन अलिकडेच एलन मस्क यांच्या स्पेसएक्सशी जोडले गेले आहेत.

Advertisement
Tags :

.