For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकच्या सागरी क्षेत्रात मिळाला कच्च्या तेलाचा साठा

06:27 AM Sep 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकच्या सागरी क्षेत्रात मिळाला कच्च्या तेलाचा साठा
Advertisement

वृत्तसंस्था/ कराची

Advertisement

पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा मिळाला आहे. या साठ्याच्या उत्खननातून देशाची आर्थिक स्थिती बदलू शकते असे मानले जात आहे.  कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू साठ्याच्या अस्तित्वाच्या पुष्टीसाठी पाकिस्तानने एका मित्र देशाच्या सहकार्यातून तीन वर्षांपर्यंत सर्वेक्षण केले होते.

भौगोलिक सर्वेक्षणामुळे पाकिस्तानला साठ्याच्या स्थानाची ओळख पटविण्यास मदत मिळाली आहे. संबंधित विभागांनी सरकारला पाकिस्तानी सागरी क्षेत्रातील कच्च्या तेलाच्या साठ्यासंबंधी माहिती दिली आहे.

Advertisement

या साठ्याचे उत्खनन करण्यासाठी आता सरकारकडून संशोधन प्रस्ताव मागविले जात आहेत. यामुळे नजीकच्या भविष्यात यासंबंधीचे कार्य सुरू केले जाणार असल्याचे मानण्यात येते. कच्च्या तेलाच्या विहिरी निर्माण करणे आणि त्यातून कच्चे तेल बाहेर काढण्यास अनेक वर्षे लागू शकतात.

यासंबंधी पुढाकार घेत लवकर काम पूर्ण केल्याचे देशाची आर्थिक स्थिती बदलून टाकण्यास मदत मिळेल असे एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. काही अनुमानांनुसार पाकिस्तानात सापडलेला कच्च्या तेलाचा साठा हा जगातील चौथ्या क्रमांकाचा साठा असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.