For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समुद्रात 2000 मीटर खोलवर ‘स्पेस स्टेशन’

06:12 AM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
समुद्रात 2000 मीटर खोलवर ‘स्पेस स्टेशन’
Advertisement

चीनकडून होतेय निर्मिती, अमेरिकेला बसला धक्का

Advertisement

चीनने अनेक वर्षांच्या तांत्रिक समीक्षेनंतर खोल समुद्रात संशोधन केंद्र स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. याला समुद्रातील ‘स्पेस स्टेशन’ देखील म्हटले जात आहे. हे पाऊल महत्त्वपूर्ण आहे कारण यामुळे सागरी शोधाची पुन्हा व्याख्या करावी लागू शकते. याचबरोबर जगातील सर्वात साधनसामग्रीने समृद्ध क्षेत्रांपैकी एकात चीन भू-राजकीय लाभाला वाढवू शकतो. कोल्ड सीप इकोसिस्टीम रिसर्च फॅसिलिटी रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण दक्षिण चीन समुद्राच्या पृष्ठभागापासून 200 मीटर खोलवर स्थापन करण्यात येणार आहे. या क्षेत्रावर अनेक देशांचा दावा आहे. तीरही चीन स्वत:च्या आक्रमक सैन्य रणनीतिने सर्वांना त्रस्त करत आहे.

2030 मध्ये सुरू होणार केंद्र

Advertisement

हे केंद्र आतापर्यंतच्या सर्वात खोल अन् तांत्रिक स्वरुपात सर्वात जटिल अंडरवॉटर इन्स्टॉलेशनपैकी एक असेल. हे केंद्र 2030 च्या सुमारास सुरु होणार असून यात 6 वैज्ञानिकांसाठी जागा असेल, जे एक महिन्यापर्यंत चालणाऱ्या मिशनवर असतील. या सुविधा केंद्राला संशोधन समुदायादरम्यान खोल समुद्रातील  स्पेस स्टेशन म्हणून ओळखले जाते. याचा वापर कोल्ड सीप पारिस्थितिकी तंत्रांचे अध्ययन करण्यासाठी केला जाईल. हे मिथेन-समृद्ध हायड्रोथर्मल वेंट असून जे अद्वितीय जीवन रुपांनी भरले आहे आणि यात मिथेन हायड्रेटसचे विशाल भांडार असून त्याला ज्वलनशील बर्फ असेही म्हटले जाते.

समुद्रातील खजिना बाहेर काढणार

स्टेशनच्या डिझाइनचा तपशील चिनी अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या साउथ चायना सी इन्स्टीट्यूट ऑफ ओशनोलॉजीचे संशोधक यिन जियानपिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी  मॅन्युफॅक्चरिंग अँड अपग्रेडिंग टुडे नियतकालिकात प्रकाशित केला आहे. प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये लाँग टर्म लाइफ सपोर्ट सिस्टीम सामील आहे. मिथेन प्रवाह, पारिस्थितिक बदल आणि टेक्टोनिक हालचालींना टॅक करण्यासाठी एक स्थायी देखरेख नेटवर्कची निर्मिती आणि संचालन करताना याची आवश्यकता भासणार आहे.

पृथ्वीच्या कोअरपर्यंत पोहोच

स्टेशनचा उद्देश मानवरहित पाणबुड्या, पृष्ठभागावरील जहाज आणि समुद्रतळ वेधशाळांसोबत मिळून काम करणे आहे, जेणेकरून एक फोर डायमेंशनल देखरेख ग्रिड तयार करता येईल. हे स्टेशन एक व्यापक इन्फ्रास्ट्रक्चर वेबचा आधार ठरेल, ज्यात समुद्रतळावर चीनचे विशाल फायबर-ऑप्टिक नेटवर्क आणि ड्रिलिंग जहाज मेंगजियांग सामील असेल, ज्याचे लक्ष्य पृथ्वीच्या मेंटपर्यंत पोहोचणारे पहिले यान ठरणे असल्याचा दावा यिन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे

Advertisement
Tags :

.