सपा नेते आझम खान इस्पितळात
07:00 AM Aug 05, 2022 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
लखनौ / वृत्तसंस्था
Advertisement
समाजवादी पक्षाचे नेते मोहम्मद आझम खान यांना गुरुवारी प्रकृती अस्वास्थ्यामुळे इस्पितळात दाखल करण्यात आले. फुफ्फुसाचा न्यूमोनिया आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे लखनौमधील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱयांच्या तपासणीनंतर आवश्यक चाचण्या करून त्यांना क्रिटिकल केअर टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अजूनही स्थिर आहे. मेदांता इस्पितळातील क्रिटिकल केअर टीमचे प्रमुख डॉ. दिलीप दुबे यांच्यासह त्यांचे सहकारी आझम खान यांच्यावरील सर्वोत्तम उपचारांसाठी सतत प्रयत्नशील आहेत.
Advertisement
Advertisement
Next Article