For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

06:10 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
समाजवादी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

यादव कुटुंबातील तीन जणांना उमेदवारी : मैनपुरीतून डिंपल यादव लढणार

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

समाजवादी पक्षाने यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी स्वत:च्या उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. यात 16 उमेदवारांची नावे सामील आहेत. डिंपल यादव, धर्मेंद्र यादव आणि अक्षय यादव यासारख्या मोठ्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इंडिया आघाडी अंतर्गत जागावाटपासाठी चर्चा सुरू असताना उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Advertisement

सपच्या पहिल्या यादीत 11 ओबीसी, एक मुस्लीम, एक ठाकूर, 1 टंडन आणि 1 खत्री समुदायाचा उमेदवार आहे. 11 ओबीसी उमेदवारांपैकी 4 जण कुर्मी, 3 यादव, 2 शाक्य, 1 निषाद आणि 1 पाल समुदायाशी संबंधित आहे. सपने अयोध्या मतदारसंघात दलित उमेदवाराला संधी दिली आहे. एटा आणि फार्रूखाबादमध्ये पहिल्यांदाच यादव उमेदवाराऐवजी शाक्य समुदायाच्या नेत्याला संधी देण्यात आली आहे.

Advertisement

अखिलेश यादव यांनी उत्तरप्रदेशात काँग्रेसकरता 11 जागा सोडण्याची तयारी दर्शविली होती. तर रालोदकरता सपकडून 7 जागा सोडण्यात येणार आहेत. परंतु या फॉर्म्युल्यावर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर उत्तरप्रदेशातील आघाडीसंबंधी साशंकता निर्माण झाली आहे. याचदरम्यान अखिलेश यादव यांनी 16 उमेदवार जाहीर केले आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून उत्तरप्रदेश हे सर्व राजकीय पक्षांसाठी सर्वात महत्त्वपूर्ण राज्य आहे. येथे सर्वाधिक 80 लोकसभा मतदारसंघ आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील 80 पैकी 64 जागांवर रालोआने विजय मिळविला होता. तर 2014 च्या निवडणुकीत रालोआने 80 पैकी 73 जागा जिंकल्या होत्या.

Advertisement
Tags :
×

.