महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोयाबीन उत्पादक शेतकरी सापडला अडचणीत

10:38 AM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाला फटका : काढणी लांबणीवर, पिकांचे नुकसान, किडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव : शेतकरी चिंतेत

Advertisement

वार्ताहर/किणये

Advertisement

सोयाबीन हे खरीप हंगामातील महत्त्वाचे पीक आहे. त्यामध्ये 19 टक्के तेलाचे व 42 टक्के प्रथिनांचे प्रमाण असल्यामुळे हे तेलबिया तसेच कडधान्य पीक म्हणून ओळखले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ 48 टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. यामुळे या पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्याचा कल अधिक आहे. तालुक्याच्या हलगा, बस्तवाड, नंदिहळ्ळी, राजहंसगड, कोंडुसकोप, तारिहाळ या भागात हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. सध्या पीक काढणीला आले असून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

यंदा खरिप हंगामात अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीन पिकाला हा पाऊस मारक ठरला आहे. यातही पाण्याचा बऱ्यापैकी निचरा होणाऱ्या शिवारातील सोयाबीन पीक बहरुन आले. त्याची काढणी सुरू आहे. मात्र आठवड्याभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन कुजून जात आहे. त्यामुळे पीक उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी केलेला खर्च आता कसा भरून काढावा, याची चिंता लागून राहिली आहे. बळीराजाला नेहमीच अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. परतीच्या पावसामुळे भुईमूग पिकावर परिणाम झाला आहे.

त्याची काढणी खोळंबलेली आहे. सततच्या पावसामुळे भुईमूग शेंगा जमिनीतून पुन्हा उगवत आहेत. या भुईमूगची काढणी कशी करायची? याची चिंता शेतकऱ्यांना लागलेली आहे. तसेच बस्तवाड, हलगा, तारिहाळ या भागात खरीप हंगामात सोयाबीन हे नगदी पीक म्हणून घेतले जाते. यंदा मात्र हवामानातील बदलामुळे आणि अधिक पावसामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला व ऐन सोयाबीन काढणीच्या हंगामातच परतीच्या पावसाचे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीनच्या तरूंना शेंगा बहरुन आल्या आहेत. त्याची वेळेवर काढणी होणे गरजेचे आहे. मात्र पाऊस झाल्यामुळे हे पीक खराब झाले असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

बेळगावातील वातावरण या पिकासाठी पोषक असल्यामुळे याची अधिक प्रमाणात पेरणी करण्यात येऊ लागली आहे. तेलासाठी शेतकरी याचा उपयोग करत आहेत. एका एकराला 30 किलोचे एक पोते सोयाबीन बियाणे लागते. बियाणे जर घरगुती असतील तर ती चांगल्या प्रतीची असावी लागतात. बहुतांशी शेतकरी बियाणांची खरेदी करूनच पेरणी करत आहेत. मध्यम ते भारी व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत सोयाबीनची पेरणी या भागातील शेतकरी करतात. पेरणीपूर्व मशागतीच्यावेळी शेणखत घालण्यात येते. त्यानंतर सोयाबीनची पेरणी करताना डीएपी खत घालण्यात येते. यानंतर कोळपणी, भांगलण व आंतर मशागत केली जाते.

एकरी खर्च 15 हजार

सोयाबीन पिकासाठी ट्रॅक्टर मशागत, बियाणे, शेणखत, रासायनिक खत, भांगलण, अंातरमशागत व काढणी आदींसाठी मिळून एकरी 15 हजार रुपये खर्च येत असल्याची माहिती बस्तवाड येथील शेतकरी पिराजी पाटील यांनी दिली आहे. खर्चाच्या तुलनेत यंदा उत्पादनात कमालीची घट झाली आहे. परतीच्या पावसाचा अधिक प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे आम्हा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. मंगळवारी दुपारी पुन्हा जोरदार पाऊस झाल्यामुळे शेत शिवारातील सोयाबीन पीक जमीनदोस्त झाले आहे, असेही पाटील यांनी सांगितले. गतवर्षी सोयाबीनला प्रति क्विंटल 3500 ते 4500 रुपये असा दर मिळाला होता. एका एकरला किमान 6 ते 8 क्विंटल इतके उत्पादन मिळते. मग खर्चाच्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे. सोयाबीनला योग्य दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

पाऊस सुरूच राहिल्यास मळणी करणे अवघड

यंदा आमच्या दोन एकर शिवारात सोयाबीनची पेरणी केली आहे. अधिक पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे पीक थोड्या प्रमाणात खराब झाले तर उर्वरित पीक बऱ्यापैकी बहरुन आले होते. त्याच्या काढणीच्या कालावधीतच परतीचा पाऊस सुरू झाला आहे. यामुळे सोयाबीनच्या शेंगा काळसर पडल्या आहेत. असाच परतीचा पाऊस चालू राहिल्यास सोयाबीनची मळणी करणे अवघड जाणार आहे.

- सोनाप्पा काकतकर, शेतकरी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article