महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पुरुष सांघिक तिरंदाजीत द.कोरियाला सुवर्ण

06:39 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

यजमान फ्रान्सला रौप्य, तुर्कीला कांस्यपदक

Advertisement

वृत्तसंस्था/ पॅरिस

Advertisement

येथे झालेल्या पुरुषांच्या सांघिक तिरंदाजी स्पर्धेत यजमान फ्रान्सच्या तिरंदाजांना बलाढ्या दक्षिण कोरियाची घोडदौड रोखण्यात अपयश आले आणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तुर्कीने चीनचा 6-2 असा पराभव करून कांस्यपदक मिळविले.

पहिल्या सेटमध्ये दोन्ही संघांची 57-57 अशी बरोबरी झाल्यानंतर द.कोरियाने दुसरे सेट 59-58 व तिसरा सेटही 59-58 असा घेत एकूण 5-1 अशा फरकाने विजय मिळवित सुवर्णपदक पटकावले. किम वू जिन, किम जे डेओक व ली वू सेओक यांनी दक्षिण कोरियाला सलग तिसरे सुवर्ण मिळवून दिले. किम वू जिन हा मागील दोन सुवर्णविजेत्या संघाचा सदस्यही होता. मात्र त्याला वैयक्तिक सुवर्ण अजूनही एकदाही जिंकता आलेले नाही. 4 ऑगस्ट रोजी तो वैयक्तिक विभागात भाग घेणार आहे. योशिवाय 2 ऑगस्ट रोजी तो मिश्र सांघिक प्रकारातही भाग घेणार आहे. 1972 मध्ये या क्रीडा प्रकाराने ऑलिम्पिकमध्ये पुनरागमन केले आणि तेव्हापासून आतापर्यंत सातवेळा द.कोरियाने सुवर्णपदके मिळविली आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article