महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सुपरस्टार थलपती विजय करणार राजकारणात प्रवेश

06:46 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Superstar Thalapathy Vijay
Advertisement

स्वत:चा पक्ष स्थापन करण्याची तयारी : थलापति विजयचा तामिळनाडूत मोठा चाहतावर्ग

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार थलापति विजय आता राजकारणात स्वत:चे भविष्य आजमाविण्याची तयारी करत आहे. विजय आता रजनीकांत यांच्याप्रमाणे स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करण्याची तयारी करत आहे. रजनीकांत यांनी यापूर्वी स्वत:चा राजकीय पक्ष विसर्जित करत राजकारणातून संन्यासही घेतला होता. तर थलापति विजय याचा पक्ष अद्याप स्थापन झालेला नाही. या पक्षाचा विजयच अध्यक्ष असून त्याने निवडणूक आयोगात नोंदणी करविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

नोंदणीपूर्वी पक्षाचे 200 सदस्य बैठकीसाठी एकत्र आले होते. पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी समिती स्थापन झाली आहे. याचबरोबर महासचिव आणि खजिनदारही नियुक्त करण्यात आला आहे. कार्यकारिणी समितीने विजय यालाच पक्षाचे नाव निश्चित करण्यासाठी अधिकृत केले आहे. 2026 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी विजय हा राजकारणात एंट्री करणार आहे. तर तामिळनाडूच्या परंपरेचे पालन करत विजय स्वत:च्या पक्षाच्या नावात कझगम हा शब्द सामील करू शकतो.

तमिळ चित्रपटसृष्टीत विजय हा रजनीकांत यांच्यानंतर सर्वाधिक लोकप्रिय असलेला कलाकार आहे. त्याने 68 चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर त्याची राजकीय महत्त्वाकांक्षा देखील तितकीच जुनी आहे. तो दीर्घकाळापासून सेवाकार्य करत आहे. भोजनवाटप, शिष्यवृत्ती, वाचनालय, शिकवणी वर्ग अणि अन्य गोष्टींकरता तो विद्यार्थ्यांना मदत करत असतो.

अलिकडेच विजयने विधानसभा मतदारसंघ स्तरावर गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करविले होते. विजय हा विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पेरियार, कामराज यांच्यासारख्या महापुरुषांकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन करत असतो. विजय याचे पिता चंद्रशेखर हे चित्रपट दिग्दर्शक होते. तर विजय याच्या चित्रपटांची कथा ही प्रामुख्याने राजकारणाशी संबंधितच असते. सरकारला लक्ष्य करण्याच्या संदेशामुळे त्याचे चित्रपट वादग्रस्त देखील ठरले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article