महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

टी-20 मालिकेत द. आफ्रिकेची विजयी सलामी

06:54 AM Dec 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पाकचा 11 धावांनी पराभव, जॉर्ज लिनेडी ‘सामनावीर’

Advertisement

वृत्तसंस्था / दरबान

Advertisement

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत यजमान द. आफ्रिकेने पाकचा 11 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात जॉर्ज लिनेडीला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले. त्याने फलंदाजीत 24 चेंडूत 48 धावा तर गोलंदाजीत 21 धावांत 4 बळी बाद केले.

या सामन्यात द. आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. द. आफ्रिकेने 20 षटकात 9 बाद 183 धावा जमविल्या. त्यानंतर पाकने 20 षटकात 8 बाद 172 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 11 धावांनी गमवावा लागला.

द. आफ्रिकेच्या डावात डेव्हिड मिलरने 40 चेंडूत 8 षटकार आणि 4 चौकारांसह 82 धावा झळकविल्या. जॉर्ज लिनेडीने 24 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 48 तसेच कर्णधार क्लासनने 13 चेंडूत 1 षटकारासह 12 आणि मिफेखाने 11 चेंडूत 2 चौकारांसह नाबाद 12 धावा मजविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 14 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे शाहीन आफ्रिदी आणि अब्रार अहम्मद यांनी प्रत्येकी 3 तर अब्बास आफ्रिदीने 2 तसेच मुक्कीमने 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 43 धावा जमविताना 3 गडी गमविले. द. आफ्रिकेचे अर्धशतक 28 चेंडूत, शतक 66 चेंडूत तर दीड शतक 105 चेंडूत नोंदविले गेले. मिलरने 28 चेंडूत 5 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावात सलामीचा फलंदाज आणि कर्णधार मोहम्मद रिझवानने 62 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह 74 तर सईम आयुबने 15 चेंडूत 7 चौकारांसह 31 तसेच तयाब ताहीरने 1 षटकार आणि 1चौकारांसह 18 चेंडूत 18 धावा केल्या. पाकच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकच्या डावात 4 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. पाकने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 55 धावा जमविताना एक गडी गमविला. पाकचे अर्धशतक 35 चेंडूत तर शतक 76 चेंडूत आणि दीड शतक 105 चेंडूत फलकावर लागले. द. आफ्रिकेतर्फे जॉर्ज लिनेडीने 21 धावांत 4 तर माफेकाने 39 धावांत 2, बार्टमन आणि सिमलेनी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. पाकच्या डावात 23 अवांतर धावा मिळाल्या.

संक्षिप्त धावफलक: द. आफ्रिका 20 षटकात 9 बाद 183 (मिलर 82, क्लासन 12, लिनेडी 48, माफेका नाबाद 12, शाहीन आफ्रिदी व अब्रार अहम्मद प्रत्येकी 3 बळी, अब्बास आफ्रिदी 2-30, मुक्कीम 1-53), पाक 20 षटकात 8 बाद 172 (मोहम्मद रिझवान 74, तयाब ताहीर 18, सईम आयुब 31, अवांतर 23, लिनेडी 4-21, माफेका 2-39, बार्टमन व सिम्लेनी प्रत्येकी 1 बळी)

शाहीन आफ्रिदीचा विक्रम

पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने क्रिकेटच्या तिनही प्रकारात 100 बळींचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम केला आहे. पाकच्या क्रिकेट इतिहासात असा विक्रम करणारा शाहीन आफ्रिदी हा पहिला पाकिस्तानी गोलंदाज आहे.

द. आफ्रिकाबरोबरच्या दरबान येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात शाहीन आफ्रिदीने तीन गडी बाद केले. 24 वर्षीय आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये 112 तर कसोटी क्रिकेटमध्ये 116 गडी बाद केले आहेत. टी-20 प्रकारात बळींचे शतक नोंदविणारा शाहीन आफ्रिदी हा तिसरा फलंदाज आहे. यापूर्वी पाकच्या हॅरिस रौफ आणि शदाब खान यांनी असा पराक्रम केला आहे. शाहीन आफ्रिदीने आपल्या वैयक्तिक 74 व्या टी-20 सामन्यात बळींचे शतक पूर्ण केले. क्रिकेटमध्ये असा पराक्रम करणारा शाहीन आफ्रिदी हा सर्वात कमी वयाचा क्रिकेटपटू असून तो आता न्यूझीलंडच्या टीम साऊदी, बांगलादेशचा शकीबअल हसन आणि लंकेच्या लसिथ मलिंगा यांच्या यादीमध्ये दाखल झाला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article