For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

द. आफ्रिकेचा वनडे मालिका विजय

06:00 AM Oct 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
द  आफ्रिकेचा वनडे मालिका विजय
Advertisement

‘सामनावीर’ स्टब्जचे नाबाद शतक, आयर्लंड पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/अबु धाबी

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत द. आफ्रिकेने दुसऱ्या सामन्यात आयर्लंडचा 174 धावांनी दणदणीत पराभव करत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. तत्पूर्वी उभय संघातील टी-20 मालिका बरोबरीत राहिली होती. वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द. आफ्रिकेतर्फे ‘सामनावीर’ ट्रिस्टेन स्टब्जने आपले पहिले शतक झळकविले.

Advertisement

या सामन्यात द. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 4 बाद 343 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 31 षटकांत 169 धावांत आटोपला. द. आफ्रिकेच्या संघातील प्रत्येक गोलंदाजाने 1 गडी बाद केला. वेगवान गोलंदाज लिझार्ड विलियम्सने 36 धावांत 3 गडी बाद केले. या सामन्यात द. आफ्रिकेचा कर्णधार बहुमाला दुखापत झाली. त्यामुळे तो 35 धावांवर निवृत्त झाला. बहुमाने यानंतर मैदानात प्रवेश केला नसल्याने द. आफ्रिकेचे नेतृत्व व्हॅन डेर ड्युसेनने केले. ड्युसेनने 35 तर व्हेरेनीने 64 चेंडूत 67 धावा जमविल्या. मुल्डेरने 43 धावांचे योगदान दिले. सलामीच्या रिक्लेटोनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 40 धावा केल्या. स्टब्जने 81 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 112 धावा झळकविल्या. द. आफ्रिकेच्या डावात 6 षटकार आणि 26चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे यंग, कॅम्पर, मॅकब्रीने आणि होए यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात 11 व्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या क्रेग यंगने 21 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 29, हुमेने 2 षटकारांसह 21, होएने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, मार्क अॅडेरने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 21, टेक्टरने 2 चौकारांसह 20, कॅम्परने 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. द. आफ्रिकेतर्फे विलियम्सने 3, एन्गिडीने 38 धावांत 2, फॉर्च्युनने 36 धावांत 2 तर बार्टमन, फेलुकेवायो आणि मुल्डेर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. आता या मालिकेतील शेवटचा सामना सोमवारी खेळविला जाणार आहे. द. आफ्रिकेचा संघ ही मालिका एकतर्फी जिंक्यण्यासाठी प्रयत्न करेल. या मालिकेतील पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेने आयर्लंडचा 139 धावांनी पराभव केला होता.

संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका 50 षटकात 4 बाद 343 (स्टब्ज नाबाद 112, व्हेरेनी 67, रिक्लेटोन 40, बहुमा 35, व्हॅन डेर ड्युसेन 35, मुल्डेर 43, यंग, कॅम्पर, मॅकब्री आणि होए प्रत्येकी 1 बळी), आयर्लंड 30.3 षटकात सर्वबाद 169 (यंग नाबाद 29, होए 23, हुमे 21, अॅडेर 21, टेक्टर 20, कॅम्पर 17, विलीयम्स 3-36, एन्गिडी 2-38, फॉर्च्युन 2-36, बार्टमन, मुल्डेर, फेलुकेवायो प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :

.