For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाक वनडे संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद रिझवान

10:20 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाक वनडे संघाच्या कर्णधारपदी मोहम्मद रिझवान
Advertisement

वृत्तसंस्था/लाहोर

Advertisement

ऑस्ट्रेलिया आणि झिंबाब्वेच्या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी पीसीबीने यष्टीरक्षक आणि फलंदाज मोहम्मद रिझवानची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. आता बाबर आझमच्या जागी मोहम्मद रिझवानची निवड केली आहे. पाकच्या या दौऱ्याला 4 नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल. पाक संघातील सलमान अली आगाला उपकर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर पाकचा संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेतील मेलबर्नला 4 नोव्हेंबरपासून प्रारंभ होईल. झिंबाब्वेच्या दौऱ्यावर होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी सलमान अली आगाची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. झिंबाब्वे दौऱ्यासाठी मोहम्मद रिझवानला क्रिकेटचा अधिक ताण पडत असल्याने विश्रांती देण्यात आली आहे. झिंबाब्वेच्या दौऱ्यात पाकचा संघ 3 वनडे आणि 3 टी-20 सामने खेळणार आहे. या मालिका 24 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर दरम्यान खेळवल्या जातील. वनडे मालिकेतील पहिला सामना बुलावायो येथे होईल.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या पाक संघामध्ये बाबर आझम, शाहिन आफ्रीदी आणि नसिम शहा यांचे पुनरागमन झाले आहे. पाकच्या या तीन क्रिकेटपटूंना इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटींमध्ये वगळण्यात आले होते. तर झिंबाब्वे दौऱ्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या मालिकांसाठी पाक संघामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. फखर झमान आणि सदाफ खान हे वरिष्ठ खेळाडू निवडीवेळी उपलब्ध नव्हते. झिंबाब्वेच्या दौऱ्यात वनडे आणि टी-20 साठी पाक निवड समितीने काही नव्या क्रिकेटपटूंना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी पीसीबीचे प्रमुख मोहसीन नक्वी यांनी पत्रकार परिषदेत पाक संघाची घोषणा केली. बाबर आझमला कप्तानपदाची जबाबदारी नको असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

32 वर्षीय मोहम्मद रिझवानने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 74 वनडे आणि 102 टी-20 सामन्यात फलंदाजीत 4 शतकांसह 5401 धावा जमविल्या असून यष्टीमागे त्याने 143 बळी मिळविले आहेत. मोहम्मद रिझवान हा पाकचा 31 वा कर्णधार आहे. 4 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात पहिला सामना होईल. तर उभय संघातील पहिला टी-20 सामना 14 नोव्हेंबरला ब्रिस्बेनमध्ये खेळविला जाईल. क्रिकेटच्या वनडे प्रकारात मोहम्मद रिझवान हा पाकचा 12 वा कर्णधार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाक संघ 

वनडे : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफीक, अराफत मिनहास, बाबर आझम, फैझल अक्रम, हॅरिस रौफ, हसिबुल्ला, कमरान गुलाम, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद इरफान खान, नसिम शहा, सईम अयुब आणि शाहिन आफ्रिदी.

पाक टी-20 संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), आराफत मिनहास, बाबर आझम, हॅरिस रौफ, हसिबुल्ला, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद इरफान खान, नसिम शहा, ओमर बिन युसूफ, एस. फरहान, शाहिन आफ्रिदी, सुफियान मोकिम आणि उस्मान खान.

झिंबाब्वे दौऱ्यासाठी पाक वनडे संघ : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), अमीर जमाल, अब्दुल्ला शफिक, अब्रार अहमद, अहमद डॅनियल, फैजल अक्रम, हॅरिस रौफ, हसिब्बुल्ला, कमरान गुलाम, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद इरफान खान, सईम आयुब, शहनवाज दाहिनी आणि तयाब ताहिर.

पाक टी-20 संघ : सलमान अली आगा (कर्णधार), अहमद डॅनियल,अराफत मिनहास, हॅरिस रौफ, हसिबुल्ला, जहाँदाद खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद हेसनेन, मोहम्मद इरफान खान, ओमर बिन युसूफ, कासिम अक्रम, एस. फरहान, सुफियान, मोकिम, तयाब ताहिर आणि इस्मान खान.

Advertisement
Tags :

.