महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

द.आफ्रिकेचा बांगलादेशवर रोमांचक विजय

06:55 AM Jun 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सलग तिसरा विजय : शेवटच्या षटकात केशव महाराजची अफलातून गोलंदाजी : क्लासेनचीही 46 धावांची महत्वपूर्ण खेळी

Advertisement

वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क

Advertisement

येथील नासाऊ कौंटी इंटरनॅशनल स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशने कडवा प्रतिकार केला पण त्यांना विजयापर्यंत पोहोचता आले नाही. प्रथम फलंदाजी करताना द. आफ्रिकेने 6 बाद 113 धावा केल्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला 7 बाद 109 धावापर्यंत मजल मारता आली. दरम्यान, आफ्रिकेचा हा वर्ल्डकपमधील सलग तिसरा विजय आहे. या विजयासह त्यांना सुपर 8 मध्ये देखील स्थान मिळाले आहे.

आफ्रिकेने विजयासाठी दिलेल्या 114 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर तनजीद हसन स्वस्तात बाद झाला. लिटन दास व शकीब अल हसन हे दोघेही स्वस्तात परतले. कर्णधार नजमुलला फारसा चमत्कार दाखवता आला नाही. तौहिद हृदय आणि महमुदुल्लाह यांच्यात 33 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. बांगलादेशकडून हृदयने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 34 चेंडूत 37 धावा केल्या. मात्र अखेरच्या षटकांमध्ये दक्षिण आफ्रिकेने केलेल्या तगड्या गोलंदाजीमुळे त्यांचा 4 धावांनी विजय झाला. शेवटच्या 2 षटकात बांगलादेशला विजयासाठी 18 धावांची गरज होती. तर बांगलादेशला शेवटच्या षटकात 11 धावा करायच्या होत्या, यावेळी केशव महाराज गोलंदाजीला होता. या षटकात केवळ 5 झाल्या आणि 2 फलंदाज बाद झाले. सेट झालेला महमुदउल्लाह नॉन-स्ट्रायकिंग एंडला होता. तो चौथ्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा विजय जवळपास निश्चित झाला होता. शेवटच्या चेंडूवर फटका लागला नाही त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने सामना 4 धावांनी जिंकला.

आफ्रिकेचा रोमहर्षक विजय

प्रारंभी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीस आलेल्या दक्षिण आफ्रिकेची सुरुवात फारच खराब झाली. पहिल्याच षटकात रीझा हेंड्रिक्स गोल्डन डकवर बाद झाला. त्याला तंजीम हसन साकिबने बाद केले. यानंतर साकीबने क्विंटन डी कॉक आणि कर्णधार एडन मार्कराम यांचीही विकेट घेतली. डी कॉक 18 धावा करून बाद झाला तर मार्कराम केवळ 4 धावा करून बाद झाला. काही वेळाने ट्रिस्टन स्टब्सही शुन्यावर पायचीत झाला.

लागोपाठ विकेट गेल्याने आफ्रिकेची 4 बाद 23 अशी स्थिती झाली होती. यावेळी हेनरिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी 79 धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. हेनरिक क्लासेनने 44 चेंडूत 46 धावा केल्या आणि यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 3 षटकार ठोकले. दुसरीकडे, डेव्हिड मिलरने 38 चेंडूत 29 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बांगलादेशसाठी, विशेषत: तनझिम हसन शाकिब अत्यंत घातक गोलंदाजी करताना दिसला. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या क्लासेनला तस्कीन अहमदने बाद केले. यानंतर पाठोपाठ मिलरही बाद झाला. मार्को यान्सेन 5 तर केशव महाराज 4 धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकन संघाला 20 षटकांत 6 बाद 113 धावा करता आल्या. बांगलादेशकडून तंजीम हसनने 3 तर तस्कीन अहमदने 2 गडी बाद केले.

 

संक्षिप्त धावफलक : दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 113 (डिकॉक 18, क्लासेन 46, डेव्हिड मिलर 29, यान्सेन नाबाद 5, महाराज नाबाद 4, तंजीम हसन 3 तर तस्कीन अहमद 2 बळी).

बांगलादेश 20 षटकांत 7 बाद 109 (नजमुल हुसेन शांतो 14, तौहीद 37, मेहमुदुल्लाह 20, केशव महाराज 3 तर नोर्तजे व रबाडा प्रत्येकी दोन बळी).

Advertisement
Next Article