महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द.आफ्रिकेचा 566 धावांचा डोंगर

06:06 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिक्लेटनचे द्विशतक, बवुमा,व्हेरेनी यांची शतके

Advertisement

वृत्तसंस्था / केप टाऊन

Advertisement

रेयान रिक्लेटनचे शानदार द्विशतक तसेच कर्णधार बवुमा आणि व्हेरेनी यांच्या दमदार शतकांच्या जोरावर यजमान द. आफ्रिकेने दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत शनिवारी खेळाच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या डावात पाक विरुद्ध चहापानापर्यंत 7 बाद 566 धावा जमविल्या. रिक्लेटनने कसोटीतील आपले पहिले द्विशतक (259) तसेच बवुमाने 106 आणि व्हेरेनीने 100 धावा झोडपल्या.

दोन सामन्यांच्या या कसोटी मालिकेत द. आफ्रिकेने पहिला सामना जिंकून पाकवर यापूर्वीच आघाडी घेतली आहे. आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप अंतर्गत दोन सामन्यांची ही कसोटी मालिका खेळविली जात आहे. केप टाऊनच्या फलंदाजीस अनकुल असलेल्या खेळपट्टीवर द. आफ्रिकेने पाकच्या गोलंदाजीची धुलाई केली. या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवसाअखेर द. आफ्रिकेने 4 बाद 316 धावा जमविल्या होत्या. रिक्लेटनने 176 तर बेडींगहॅम 4 धावांवर खेळत होते.

रिक्लेटनचे द्विशतक

कर्णधार बवुमाने शुक्रवारी सामन्याच्या पहिल्या दिवशीच शतक झळकविताना 179 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 106 धावा जमविताना रिक्लेटन समवेत चौथ्या गड्यासाठी 235 धावांची द्विशतकी भागिदारी केली. शनिवारी खेळाला सुरुवात झाल्यानंतर पाकच्या मोहम्मद अब्बासने बेडींगहॅमला 5 धावांवर झेलबाद केले. त्यानंतर व्हेरेनीने रिक्लेटनला चांगलीच साथ दिली. उपाहारापूर्वी रिक्लेटनने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले द्विशतक झळकविले. त्याने 266 चेंडूत 1 षटकार आणि 24 चौकारांसह द्विशतक पूर्ण केले. उपाहारापूर्वी द. आफ्रिकेने 107 षटकात 5 बाद 429 धावा जमविल्या होत्या. खेळाच्या पहिल्या सत्रात द. आफ्रिकेने 113 धावांची भर घालताना एकमेव गडी गमविला. उपाहारावेळी रिक्लेटन 213 तर व्हेरेनी 74 धावांवर खेळत होते. व्हेरेनीने 70 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तर सहाव्या गड्यासाठी त्याने रिक्लेटन समवेत शतकी भागिदारी 132 चेंडूत नोंदविली.

व्हेरेनीचे शतक

उपाहारानंतर द. आफ्रिकेच्या फलंदाजांनी चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रात 137 धावांची भर घालताना आणखी 2 गडी गमविले. व्हेरेनीने 144 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांसह झळकविले. रिक्लेटनने 336 चेंडूत 3 षटकार आणि 27 चौकारांसह 250 धावा झळकविल्या. व्हेरेनीने शतक पूर्ण केल्यानंतर तो आगा सलमानच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. रिक्लेटनला मिर हमजाने अब्बासकरवी झेलबाद केले. त्याने 343 चेंडूत 3 षटकार आणि 29 चौकारांसह 259 धावा जमविल्या. द. आफ्रिकेच्या 500 धावा 764 चेंडूत फलकावर लागल्या. रिक्लेटनने जेनसेनसमवेत सातव्या गड्यासाठी 86 धावांची भागिदारी केली. चहापानापूर्वी जेनसेनने आपले अर्धशतक 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 42 चेंडूत झळकविले. चहापानावेळी द. आफ्रिकेने 134 षटकात 7 बाद 566 धावा जमविल्या होत्या. जेनसेन 57 तर केशव महाराज 2 धावांवर खेळत होते. पाकतर्फे सलमान आगाने 129 धावांत 3 तर मोहम्मद अब्बासने 93 धावांत 2 तसेच हमझा आणि खुर्रम शहजाद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. द. आफ्रिकेने आता जून महिन्यात लॉर्डस मैदानावर होणाऱ्या आयसीसीच्या विश्व कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेत अंतिम फेरीत आपले स्थान भक्कम केले आहे.

संक्षिप्त धावफलक : द. आफ्रिका प. डाव (चहापानापर्यंत) 134 षटकात 7 बाद 566 (रिक्लेटन 259, बवूमा 106, व्हेरेनी 100, जेनसेन खेळत आहे 57, अवांतर 15, सलमान आगा 3-129, मोहम्मद अब्बास 2-93, खुर्रम शहजाद 1-119, हमजा 1-104)

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article