दुसऱ्या सामन्यात द.आफ्रिका विजयी
हेन्ड्रिक्स, मार्करमची फटकेबाजी, रिंकू, सूर्याची अर्धशतके वाया
रीझा हेन्ड्रिक्स व कर्णधार एडन मार्करम यांनी केलेल्या जोरदार फटकेबाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पावसाचा व्यत्यय आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतावर 5 गड्यांनी विजय मिळवित तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. किफायतशीर मारा करीत 18 धावांत एक बळी घेणाऱ्या शम्सीला सामनावीराचा बहुमान मिळाला. तिसरा सामना गुरुवारी 14 रोजी जोहान्सबर्गला होणार आहे. द.आफ्रिकेकडून प्रथम फलंदाजी मिळाल्यावर भारताने कर्णधार सूर्यकुमार यादव व रिंकू सिंग यांच्या अर्धशतकांमुळे 7 बाद 180 धावा फटकावल्या होत्या. शेवटच्या षटकातील तीन चेंडू बाकी असताना पावसाला सुरुवात झाल्याने नंतर दक्षिण आफ्रिकेला डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे 15 षटकांत 152 धावा करण्याची सुधारित आव्हान मिळाले.
संक्षिप्त धावफलक
भारत 19.3 षटकांत 7 बाद 180 : सूर्यकुमार 36 चेंडूत 56, तिलक वर्मा 20 चेंडूत 29, रिंकू सिंग 39 चेंडूत नाबाद 68, जडेजा 14 चेंडूत 19, शम्सी 1-18, कोएत्झी 3-32, मार्करम 1-29. द.आफ्रिका 13.5 षटकांत 5 बाद 154 : ब्रीत्झ्के 7 चेंडूत 16, हेन्ड्रिक्स 27 चेंडूत 49, मार्करम 17 चेंडूत 30, मिलर 12 चेंडूत 17, स्टब्स नाबाद 14, फेहलुक्वायो नाबाद 10, अवांतर 11, मुकेश कुमार 2-34, सिराज 1-27, कुलदीप यादव 1-26