कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दक्षिण आफ्रिका महिला संघाचा दणदणीत विजय

06:28 AM May 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

औपचारिक सामन्यात लंकन महिला संघाचा केला 76 धावांनी पराभव

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisement

येथील प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या तिरंगी मालिकेतील शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने यजमान श्रीलंकन महिला संघाचा 76 धावांनी पराभव केला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात आफ्रिकन संघाने 9 गडी गमावत 315 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना लंकन संघाचा डाव 239 धावांत आटोपला. तिरंगी मालिकेतील आफ्रिकन संघाचा हा पहिलाच विजय आहे. दरम्यान, भारतीय महिला व लंकन महिला संघाने याआधीच आपले सामने जिंकत  फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता, रविवारी दि. 11 मे रोजी उभय संघात अंतिम लढत होईल.

तिरंगी मालिकेतील शुक्रवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात लंकन महिला संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. लंकन संघाचा हा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन महिला संघाने निर्धारित 50 षटकांत 9 गडी गमावत 315 धावांचा डोंगर उभा केला. सुरुवातील सलामीवीर लॉरा वुलव्हार्ट (33) व ताजमिन ब्रिट्स (38) या जोडीने 68 धावांची सलामी दिली. ही जोडी बाद झाल्यानंतर आफ्रिकन संघाच्या मधल्या फळीने निराशा केली. यामुळे त्यांची 6 बाद 127 अशी स्थिती झाली होती. पण यावेळी क्लो ट्रायॉन व  एन्री डर्कसन जोडीने सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. डर्कसनने शतकी खेळी साकारताना 84 चेंडूत 9 चौकार व 5 षटकारांची 104 धावांची खेळी साकारली. ट्रायॉनने 51 चेंडूत 74 धावा करत तिला चांगली साथ दिली. डी क्लर्कने नाबाद 32 धावांचे योगदान दिले. लंकेकडून विहांगाने 43 धावांत 5 बळी घेतले.

यजमान लंकन संघाचा दारुण पराभव

आफ्रिकन संघाने विजयासाठी दिलेल्या 316 धावांचा पाठलाग करताना लंकन महिला संघ 42.5 षटकांत 239 धावांत ऑलआऊट झाला. लंकन कर्णधार चमारी अटापटूने सर्वाधिक 52 धावा केल्या. अनुष्का संजीवनीने 43 धावांचे योगदान दिले. याशिवाय, हर्षिता समरविक्रमाने 33 तर हस्नी परेराने 30 धावा केल्या. आफ्रिकेकडून ट्रायॉनने शानदार गोलंदाजी करताना 34 धावांत 5 बळी घेत विजयात मोलाचे योगदान दिले. फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवणाऱ्या ट्रायनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, तिने या सामन्यातील 42 व्या षटकात हॅट्ट्रिक नोंदवली. या कामगिरीसह ती आफ्रिकेकडून हॅट्ट्रिक नोंदवणारी तिसरी खेळाडू ठरली आहे.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिकन महिला संघ 50 षटकांत 9 बाद 315 (लॉरा वुलव्हार्ट 33, ताजमिन ब्रिट्स 38, डर्कसन 104, ट्रायन 74, विहांगा 5 बळी)

लंकन महिला संघ 42.5 षटकांत सर्वबाद 239 (अटापटू 52, संजीवनी नाबाद 43, समरविक्रमा 33, परेरा 30, ट्रायॉन 34 धावांत 5 बळी).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article