कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

द.आफ्रिका महिला संघाचा विंडीजवर विजय

06:26 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सुने लूस सामनावीर, वनडे मालिकेत बरोबरी

Advertisement

वृत्तसंस्था/ केव्ह हील

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिका महिला संघाने विंडीजचा 40 धावांनी पराभव करत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या सुने लूसला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

या सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजी दिली. दक्षिण आफ्रिकेने 50 षटकात 9 बाद 309 धावा जमविल्या. त्यानंतर विंडीजचा डाव 50 षटकात 269 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिका संघातील सुने लूसने तसेच शेनगेसी यांनी शानदार अर्धशतके झळकाविली.

दक्षिण आफ्रिकेच्या डावात सलामीच्या कर्णधार वुलव्हर्टने 4 चौकारांसह 28 धावा जमविताना ब्रिट्स समवेत सलामीच्या गड्यासाठी 51 धावांची भागिदारी केली. ब्रिट्सने 2 चौकारांसह 26 धावा केल्या. शेनगेसी आणि लूस यांनी तिसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी केली. शेनगेसीने 48 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 55 धावा तर लूसने 65 चेंडूत 8 चौकारांसह 76 धावा झळकाविल्या. कॅपने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 32, डर्कसेनने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 37, ट्रायोनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 28 धावा केल्या. विंडीजतर्फे फ्लेचरने 64 धावांत 4 तर मॅथ्यूजने 47 धावांत 2 तसेच अॅलेनी आणि रॅमहॅरेक यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दक्षिण आफ्रिकेच्या डावात 6 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना विंडीजच्या डावात कर्णधार मॅथ्यूज आणि कॅम्पबेल यांनी अर्धशतके नोंदविली. मॅथ्यूजने 58 चेंडूत 9 चौकारांसह 56 तर कॅम्पबेलने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 53 तर हेन्रीने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 39 धावा केल्या. जोसेफने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 17, टेलरने 1 चौकारासह 17, ग्लॅस्गोने 1 षटकार आणि 1 चौकारासह 17, जेम्सने 1 चौकारासह 18 आणि फ्लेचरने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 19 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 5 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. दक्षिण आफ्रिकेतर्फे मलाबाने 33 धावांत 4, कॅपने 42 धावांत 2 तर हुलूबी, डी. क्लर्क, ट्रायोन आणि शेनगेसी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. या मालिकेतील पहिला सामना विंडीजने जिंकला होता. त्यामुळे आता तिसरा आणि शेवटचा सामना निर्णायक ठरेल.

संक्षिप्त धावफलक - द. आफ्रिका 50 षटकात 9 बाद 309 (लूस 76, शेनगेसी 55, कॅप 32, वुलव्हर्ट 28, ट्रायोन 28, ब्रिट्स 26, फ्लेचर 4-64, मॅथ्यूज 2-47, रॅमहॅरेक आणि अॅलेनी प्रत्येकी 1 बळी), विंडीज 50 षटकात सर्व बाद 269 (मॅथ्यूज 56, हेन्री 39, कॅम्पबेल 53, फ्लेचर नाबाद 19, जोसेफ 17, टेलर 17, ग्लास्गो 17, मलाबा 4-33, कॅप 2-42, हुलुबी, डी. क्लर्क, ट्रायोन आणि शेनगेसी प्रत्येकी 1 बळी).

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article