For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर

06:50 AM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा संघ जाहीर
Advertisement

टेंबा बवुमाकडे नेतृत्वाची धुरा : 3 फिरकीपटूंचा समावेश

Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, 3 एकदिवसीय सामने आणि 5 टी 20 सामने दोन्ही संघ खेळणार आहेत. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. कसोटी मालिकेसाठी आफ्रिकेचा 15 सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. टेंबा बावुमाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली असून संघात तीन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आल्याची माहिती आफ्रिकन क्रिकेट बोर्डाने दिली.

Advertisement

नुकत्याच झालेल्या पाकविरुद्ध कसोटी मालिकेत आफ्रिकेचे नेतृत्व एडन मॅरक्रमकडे होते. आता तेम्बा बावुमाने कमबॅक केले आहे. कॅप्टन म्हणून तेम्बा बावुमा भारताविरूद्धच्या मालिकेत खेळेल. बावुमाच्या नेतृत्त्वात आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पराभूत केल होते. याशिवाय, भारतातील फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ठया पाहता संघात केशव महाराज, मुथूसामी आणि सिमॉन हार्मेर या तीन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय, कागिसो रबाडा, यान्सेन, वियान मुल्डर या वेगवान गोलंदाजांचीही संघात वर्णी लागली आहे.

अर्थात, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. दोन्ही संघांना विजयी टक्केवारी सुधारण्याची मोठी संधी या मालिकेतून मिळणार आहे. भारताने या मालिकेत अफ्रिकेला 2-0 ने मात दिली तर गुणतालिकेत थेट दुसऱ्या स्थानावर झेप घेणार आहे. तशीच संधी अफ्रिकेकडेही आहे. दरम्यान, उभय संघातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळवला जाईल. दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल. भारताविरुद्ध कसोटी मालिकेसाठी आफ्रिकन संघ : टेंबा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, डेवाल्ड ब्रेविस, झुबेर हमझा, टोनी डी जॉर्जी, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर, मार्को यान्सेन, केशव महाराज, सेनुरान मुथुसामी, सिमॉन हार्मेर, कागिसो रबाडा.

पाकिस्तानविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत खेळलेल्या संघातील बहुतेक खेळाडूंना आम्ही कायम ठेवले आहे. आम्हाला भारतातही अशाच प्रकारचे आव्हान अपेक्षित आहे आणि त्या परिस्थितीत चांगली कामगिरी करणारे अनेक खेळाडू पुन्हा एकदा आमच्यासाठी महत्त्वाचे ठरतील.

कॉनरॉड, द.आफ्रिकन संघाचे प्रशिक्षक

Advertisement
Tags :

.