कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘जी-20’ समुहात दक्षिण आफ्रिकेला स्थान नको : ट्रम्प

07:00 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वॉशिंग्टन : दक्षिण आफ्रिकेला आता जी-20 प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळू नये, असे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. चालू महिन्याच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत भाग घेणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ही शिखर परिषद दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग शहरात आयोजित होणार आहे. जोहान्सबर्गमध्ये आयोजित होणाऱ्या आगामी जी-20 परिषदेत भाग घेणार नाही. दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वासमोर दडपशाहीच्या घटना घडत आहेत, खासकरून श्वेतवर्णीय दक्षिण आफ्रिकन शेतकऱ्यांच्या मानव अधिकारांचे उल्लंघन होत असल्याने दक्षिण आफ्रिकेला आता जी-20 मध्ये स्थान मिळू नये, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच जी-20 चे अध्यक्षत्व सांभाळत असून 2-23 नोव्हेंबर या कालावधीत शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने ट्रम्प यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article