दक्षिण आफ्रिका बांगलादेशविरुद्ध विजय मिळवण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ विशाखापट्टमण
दोन विजयांसह पुन्हा एकदा शर्यतीत उतरल्यानंतर आत्मविश्वास वाढलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आज सोमवारी येथे होणाऱ्या महिला एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविऊद्धच्या त्यांच्या लढतीत आपली विजयी वाटचाल कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
इंग्लंडविऊद्धच्या पहिल्या सामन्यात 10 गड्यांनी पराभव पत्करल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाने न्यूझीलंड आणि यजमान भारतावर विजय मिळवून लय मिळवली आहे आणि त्यांच्या मोहिमेला पुन्हा एकदा शैलीदार बनवले आहे. सध्या ते उणे 0.888 नेट रन रेटसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. कागदावर कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट, मॅरिझान कॅप, टॅझमिन ब्रिट्स, सून लुस आणि अयाबोंगा खाका यांच्यासारख्या खेळाडूंचा समावेश असलेला दक्षिण आफ्रिका हा मजबूत संघ दिसतो. इंग्लंडविऊद्ध अवघ्या 69 धावांत डाव संपुष्टात आल्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले असून त्यांची वरची फळी चांगल्या स्थितीत दिसत आहे.
न्यूझीलंडविऊद्ध ब्रिट्स आणि लुसने जोरदार कामगिरी केली आणि वोल्वार्ड्टने भारताविऊद्ध तिचा दर्जा दाखविला. या आठवड्याच्या सुऊवातीला दक्षिण आफ्रिकेच्या भारताविऊद्धच्या विजयात खालच्या फळीतील फलंदाजांचे, विशेषत: नॅडिन डी क्लार्क आणि खाका यांचे योगदान महत्त्वाचे ठरले. बांगलादेशविऊद्ध अनुभवी खेळाडू मॅरिझान कॅप आणि अन्नेक बॉश अतिरिक्त ताकद मिळवून देतील, अशी अपेक्षा दक्षिण आफ्रिकेला असेल.
दक्षिण आफ्रिका संघ या मैदानावर दोन सामने खेळलेला असल्याने परिस्थितीशी परिचित आहे. दुसरीकडे, बांगलादेशने त्यांच्या स्पर्धेची सुऊवात चांगली केली आणि पाकिस्तानवर सात गड्यांनी विजय मिळवला. तथापि, इंग्लंड आणि न्यूझीलंडविऊद्धच्या सलग पराभवांमुळे त्यांची गती मंदावली आहे आणि काही सततचे कमकुवत दुवे उघडकीस आले आहेत. त्यांच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व 20 वर्षीय आशादायक वेगवान गोलंदाज माऊफा अक्तरने केले आहे. तिने आतापर्यंत पाच बळी घेतलेले आहेत आणि त्यांना फिरकीपटूंनी चांगली साथ दिली आहे.
असे असूनही बांगलादेशची सातत्यहीन वरची फळी ही एक महत्त्वाची चिंता आहे. यष्टीरक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारी कर्णधार निगार सुलताना जोती धावांसाठी संघर्ष करत आहे. स्पर्धेतील तिची सरासरी फक्त नऊ आहे. दक्षिण आफ्रिकेच्या नॉनकुलुलेको म्लाबा, अयाबोंगा खाका, मॅरिझान कॅप, मसाबता क्लास आणि क्लो ट्रायॉन यांचा समावेश असलेल्या गोलंदाजी विभागाविरुद्ध खेळताना बांगलादेशच्या फलंदाजांना कठीण लढाईचा सामना करावा लागेल. त्यांना असाधारण निकाल नोंदविण्यासाठी सुलताना, ऊबिया हैदर, निशिता अक्तर निशी आणि सुमैया अक्तरसारख्या प्रमुख खेळाडूंकडून मोठ्या योगदानाची आवश्यकता असेल.
सामन्याची वेळ : दु. 3 वा.