मालिका विजयासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज
आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना
वृत्तसंस्था/मॅके
पहिल्या सामन्यात 98 धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ सज्ज झाला आहे. शुक्रवारी, 22 ऑगस्ट रोजी मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरेना येथे हा सामना होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका संघ आघाडी घेतली आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजी उत्तम कामगिरी केली होती. परंतु पाठलाग करताना त्यांना पराभव पत्करावा लागला. कारण संघातील मधल्या फळीतील फलंदाजांनी चांगले प्रदर्शन करू शकले नाहीत.
धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरलेल्या संघात कर्णधार मिशेल मार्श हा एकमेव कामगिरी करणारा खेळाडू होता आणि तो त्याच्या खेळाडूंकडून पुढे येऊन मालिकेत पुनरागमन करण्यासाठी योगदान देण्याची आशा करेल. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेने मालिकेच्या पहिल्या सामन्यात सर्व विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. टॉप-ऑर्डरने चांगली भागिदारी करून दिल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी याचा संधीचा फायदा घेत ऑस्ट्रेलियासाठी एक साधे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात, स्टार फिरकी गोलंदाज केशव महाराजने शानदार गोलंदाजी करून पाच विकेट्स घेत कांगारूंना विजयाच्या जवळ जाण्यापासून रोखले. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याची आशा बाळगेल.
पिच रिपोर्ट
तीन दशकांहून अधिक काळानंतर द ग्रेट बॅरियर रीफ अरेना येथे आंतरराष्ट्रीय पुऊष क्रिकेट सामना होत आहे. येथे खेळलेला पहिला आणि एकमेव सामना 1992 विश्वचषकात भारत-श्रीलंका यांच्या सामन्यावेळी झाला होता. तो देखील काही चेंडू टाकल्यानंतर रद्द करण्यात आला होता. पाऊस पडण्याची शक्मयता कमीच आहे. अंदाजानुसार केवळ 15 टक्के पाऊस पडण्याची शक्मयता आहे. पृष्ठभाग ताजे असल्याने आणि फारसे माहिती नसल्याने, अशा खेळपट्टीवर प्रथम गोलंदाजी करणे चांगले होईल.