महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

रोमांचक लढतीत द.आफ्रिकेची बाजी इंग्लंडवर 7 धावांनी विजय

06:58 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सामनावीर डी कॉकचे शानदार अर्धशतक, मिलरची फटकेबाजी, ब्रूकचे अर्धशतक वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ ग्रोस आयलेट, सेंट लुसिया

Advertisement

येथील डॅरेन सॅमी क्रिकेट स्टेडिमयवर झालेल्या रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडवर सात धावांनी विजय मिळवला. आफ्रिकेचा हा सलग दुसरा विजय असून ते आता सेमीफायनलच्या उंबरठ्यावर आहेत. प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकेने 6 बाद 163 धावा केल्या. यानंतर विजयी आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला 6 बाद 156 धावा करता आल्या. दरम्यान, शेवटच्या षटकात इंग्लंडला विजयासाठी 14 धावांची गरज होती, पण एनरिक नॉर्त्जेने केवळ 6 धावा दिल्या. तसेच, या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर सेट फलंदाज हॅरी ब्रूक बाद झाला. आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने मागे धावत जाऊन शानदार झेल पकडला. या झेलमुळेच आफ्रिकन संघ सामना जिंकू शकला.

आफ्रिकेच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली आणि पहिल्या 10 षटकांमध्ये इंग्लंडला धावांचा वेग वाढवता आला नाही. एकवेळ इंग्लिश संघाची धावसंख्या 11 षटकात 4 विकेटच्या मोबदल्यात 61 धावा होती. यावेळी हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोनच्या 78 धावांच्या भागीदारीने इंग्लंडला सामन्यात परत आणले, परंतु ते विजयासाठी अपुरे ठरले. 10 षटकांनंतर  लिव्हिंगस्टोन आणि हॅरी ब्रूक यांनी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. या जोडीने 15 व्या षटकापासून वेग पकडण्यास सुरुवात केली. दोघांनी मिळून 3 षटकांत 52 धावा झोडपल्या. पण त्यानंतर 18 व्या षटकात लिव्हिंग्स्टोन बाद झाला. पाठोपाठ हॅरी ब्रूकही 20 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला. इंग्लंडकडून ब्रूकने 37 चेंडूत 53 धावांची खेळी केली. तर लिव्हिंग्स्टोनने 17 चेंडूत 33 धावा केल्या.

डी कॉकची शानदार अर्धशतकी खेळी

प्रारंभी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 बाद 163 धावा केल्या. बॅटिंग पिचवर प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर क्विंटन डी कॉकने दक्षिण आफ्रिकेला स्फोटक सुरुवात करून दिली. एकवेळ धावसंख्या बिनबाद 86 धावा होती. अशा स्थितीत आफ्रिकन संघ 200 चा पल्ला सहज पार करेल असे वाटत होते, पण मधल्या फळीतील फ्लॉप शोमुळे मोठी धावसंख्या उभारता आली नाही. डी कॉकने केवळ 38 चेंडूत 65 धावांची खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि 4 षटकार आले. हेंड्रिक्सने 19 धावा केल्या. हेंड्रिक्सला मोईन अलीने बाद केले. पाठोपाठ डी कॉकला आर्चरने बाद करत इंग्लंडला मोठे यश मिळवून दिले. डी कॉक बाद झाल्यानंतर ठराविक अंतराने आफ्रिकेने विकेट गमावल्या. हेन्रिक क्लासेन 8 धावा काढून माघारी परतला तर कर्णधार मार्करमही अपयशी ठरला. डेव्हिड मिलरने 28 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. या दोघांशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या एकाही फलंदाजाला इंग्लिश गोलंदाजांचा सामना करता आला नाही.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका 20 षटकांत 6 बाद 163 (रिझा हेंड्रिक्स 19, डी कॉक 38 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारासह 65, डेव्हिड मिलर 43, स्टब्ज नाबाद 12, केशव महाराज नाबाद 5, जोफ्रा आर्चर 3 बळी, मोईन अली व आदिल रशीद प्रत्येकी एक बळी).

इंग्लंड 20 षटकांत 6 बाद 156 (फिल सॉल्ट 11, बटलर 17, बेअरस्टो 16, हॅरी ब्रूक 37 चेंडूत 53, लिव्हिंगस्टोन 33, सॅम करन नाबाद 10, रबाडा व केशव महाराज प्रत्येकी दोन बळी, बार्टमन व नोर्त्जे प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article