द. आफ्रिका अ संघाला 392 धावांचे आव्हान
जुरेलचे नाबाद शतक, पंत, दुबे यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / बेंगळूर
ध्रुव जुरेलचे नाबाद शतक तसेच कर्णधार पंत आणि हर्ष दुबे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर भारत अ संघान sद. आफ्रिका अ संघाला विजयासाठी 392 धावांचे कठीण आव्हान दिले आहे. या मालिकेतील पहिला सामना भारत अ ने यापूर्वीच जिंकून आघाडी मिळविली आहे.
या दुसऱ्या सामन्यात भारत अ ने पहिल्या डावात 255 धावा जमविल्यानंतर द. आफ्रिका अ संघाचा पहिला डाव 221 धावांत आटोपला. भारत अ संघाने पहिल्या डावात 34 धावांची आघाडी मिळविली. त्यानंतर भारत अ ने 3 बाद 78 या धावलसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली. केएल राहुल लवकर बाद झाला. त्याने 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. संघाची धावसंख्या 108 झाली असतान कर्णधार ऋषभ पंतच्या हेल्मेटवर वेगवान चेंडू आदळल्याने त्याला काही कालावधीसाठी मैदान सोडावे लागले. तो निवृत्त झाला त्यावेळी 17 धावांवर खेळत होता. द. आफ्रिका अ संघातील वेगवान गोलंदाज मोराकीचे तीनवेळा वेगवान चेंडू पंतच्या हेल्मेटवर आदळले. कुलदीप यादव दोन चौकारांसह 16 धावांवर बाद झाला. त्यावेळी भारत अ संघाची स्थिती 5 बाद 116 अशी होती.
हर्ष दुबे आणि ध्रुव जुरेल यांनी सहाव्या गड्यासाठी 184 धावांची दीड शतकी भागिदारी केल्याने भारत अ संघाची स्थिती मजबूत झाली. दुबेने 116 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 84 धावा झोडपल्या. दुबे बाद झाल्यानंतर पंत पुन्हा मैदानात फलंदाजीसाठी आला. त्याने 54 चेंडूत 4 षटकार आणि 5 चौकारांसह 65 धावा झळकविताना जुरेलसमवेत सातव्या गड्यासाठी 82 धावांची भागिदारी केली. जुरेलने 170 चेंडूत 1 षटकार आणि 15 चौकारांसह नाबाद 127 धावा झळकविल्या. भारत अ संघाने आपला दुसरा डाव 890.2 षटकात 7 बाद 382 धावांवर घोषित करुन द. आफ्रिका अ संघाला निर्णायक विजयासाठी 417 धावांचे आव्हान दिले. द. आफ्रिका अ संघाने दिवसअखेर दुसऱ्या डावात 11 षटकात बिनबाद 25 धावा जमविल्यगा हर्मन 15, तर सिनोकवेनी 9 धावांवर गोळत आहे.
संक्षिप्त धावफलक भारत अ प. डाव 255, द. आफ्रिका प. डाव 221, भारत अ. दु. डाव 7 बाद 382 डाव घोषित (जुरेल नाबाद 127, हर्ष दुबे 84, पंत 65, पडिकल 24, सई सुदर्शन 23, राहुल 27, सिले 3-46), द. आफ्रिका दु. डाव बिनबाद 25.