मुलींना फॅट कॅम्पमध्ये पाठविण्याचा प्रकार
स्थुल युवतींशीच केला जातो विवाह
पूर्ण जगात सडपातळ होण्यासाठी लोक धडपड करत असतात. याकरता डाइट फॉलो करण्यासह औषधांचे सेवन केले जात आहे. लोक सडपातळ असण्यालाच फिट आणि सुंदर मानतात. विशेषकरून महिलांमध्ये ही क्रेझ अधिक दिसून येते.
परंतु जगात एक असे ठिकाण आहे, जेथे युवती जितकी स्थुल तितकीच सुंदर मानली जाते. विवाहापूर्वी मुलींना स्थुल करण्यासाठी फॅट कॅम्पमध्ये पाठविण्याचा प्रकार एका देशात आढळून येतो.
विवाहापूर्वी मुलींना स्थुल करण्याच्या परंपरेला लेबलु म्हटले जाते. पश्चिम आफ्रिकेतील देश मुर्तानियामध्ये ही परंपरा पाळली जाते. मुर्तानियामध्ये एखादी मुलगी विवाहयोग्य वयात आली तर तिला स्थुल करण्याचे काम सुरू हेत. पूर्वी हे काम घरातून सुरू होते, म्हणजे घरी तिला हायकॅलरीयुक्त अन्न पुरविले जाते. तरीही मुलगी स्थुल झाली तर तिला आईवडिल फॅट कॅम्पमध्ये पाठवत असतात.
या देशात मुलीने 13 किंवा 14 वर्षे वय ओलांडल्यावर तिला हाय कॅलरीयुक्त जेवण देण्यास सुरुवात केली जाते. मुलीच्या आहारात दूध, शेंगदाणे, फॅटी मीट आणि तिचे वजन वाढेल अशी प्रत्येक गोष्ट सामील केली जाते. जोपर्यंत मुलीच्या शरीरावर स्ट्रेच मार्क्स नसतील, जोपर्यंत पोटावर चरबी दिसून येत नाही तोपर्यंत ती सुंदर नसल्याचे तेथील लोक मानतात.
येथील मुलींना जबरदस्तीने प्रचंड खायला दिले जाते. अनेकदा तर यामुळे या मुलींची प्रकृती बिघडते. या देशात विवाहापूर्वी मुलींना सुमारे 16000 कॅलरी प्रतिदिन खायला दिली जाते. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार महिलांनी एका दिवसात 2 हजाराहून अधिक कॅलरीज इनटेक करू नयेत.