महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सोरेन यांची ईडीकडून चौकशी

06:00 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / रांची

Advertisement

प्रवर्तन निदेशालयाच्या अधिकाऱ्यांनी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी केली आहे. शनिवारी सकाळपासूनच झारखंडची राजधानी रांची येथे या चौकशीला प्रारंभ करण्यात आला. चौकशी करण्यासाठी ईडीचे अधिकारी सकाळीच सोरेन यांच्या अधिकृत निवासस्थानी पोहचले होते.

Advertisement

यावेळी मुख्यमंत्री निवासस्थानी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यापूर्वी सोरेन यांनी सातवेळा ईडीचे समन्स टाळले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांची त्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊनच चौकशी करण्याचा निर्णय घेतला. ईडीकडून सोरेन यांची चौकशी केली जात असतानाच झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलाविण्यात आली होती.

सोरेन यांना अटक होणार ?

मनी लाँड्रिंग प्रकरण आणि भूखंड घोटाळा या दोन प्रकरणांमध्ये सोरेन यांची चौकशी केली जात आहे. शनिवारी साधारणत: साडेसात तास ही चौकशी झाली. त्यानंतर मुख्यमंत्री सोरेन बाहेर पडले. त्यांची आणखी चौकशी होणार आहे किंवा नाही, याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. तसेच शनिवारी तरी त्यांना अटक झालेली नाही, हे देखील नंतर स्पष्ट झाले असून आता ईडीच्या पुढच्या कारवाईवर राजकीय वर्तुळाची दृष्टी लागली आहे. सोरेन यांना अटक झाल्यास त्यांच्या पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article