सोफी टर्नर पुन्हा रिलेशनशिपमध्ये
जो जोनसपासून विभक्त
पॉप सिंगर जो जोनसकडून घटस्फोट घेतल्यावर अभिनेत्री सोफी टर्नर आता स्वत:च्या जीवनात स्थिरावू लागली आहे. सोफी आता नव्याने रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. पेरेग्रीन पियर्सन या ब्रिटिश व्यक्तीला ती डेट करत आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसून आले आहेत. पेरेग्रीन पियर्सनचे पूर्ण नाव पेरेग्रीन जॉन डिकिंसन पियर्सन आहे. 29 वर्षीय पियर्सन हा एका धनाढ्या कुटुंबाचा सदस्य असून ब्रिटनच्या वेस्ट ससेक्समध्ये काउड्रे इस्टेटचा उत्तराधिकारी आहे. एकप्रकारे तो ब्रिटिश राजघराण्याचा सदस्य आहे.
पेरेग्रीन याच्या कुटुंबाची मोठी प्रॉडक्शन कंपनी आहे. ही कंपनी एकेकाळी जगातील सर्वात मोठी प्रॉडक्शन कंपनी होती. याचबरोबर त्याच्या कुटुंबांकडून अनेक उद्योगांचे संचालन केले जाते. पियर्सनने 2016 मध्ये काउड्रे इस्टेटमध्ये एक दिग्दर्शक म्हणून स्वत:ची कारकीर्द सुरू केली होती. तर 2019 मध्ये त्याने इंग्लंडमध्ये वीटमॅन ही कंपनी स्थापन केली होती आणि तेव्हापासून तो याचा मालक आहे. सोफी टर्नर ही हॉलिवूडमधील प्रख्यात अभिनेत्री असून गेम ऑफ थ्रोन्समधील अभिनयासाठी तिला ओळखले जाते. जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे.